ETV Bharat / state

नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचेच नाव; सिडकोतर्फे प्रस्थाव मंजूर - विनायक राऊत

author img

By

Published : Jun 24, 2021, 8:58 PM IST

vinayak raut latest news
नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचेच नाव; सिडकोतर्फे प्रस्थाव मंजूर - विनायक राऊत

नवी मुंबई हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. या विमानतळाला हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, याबाबतचा प्रस्थाव सिडकोने मंजूर केला आहे. बऱ्याच लोकांची तशी मागणी असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले.

सिंधुदुर्ग - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्याचा प्रस्थाव सिडकोने मंजूर केला असल्याची माहिती शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. दि.बा.पाटील यांच्याबद्दल आदर तर आहेच, ते शिवसेनेतच होते. त्यांचा योग्य सन्मान करण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

प्रतिक्रिया

विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्याची मागणी -

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. याबाबत स्थानिक पातळीवर आंदोलनाची भूमिकाही स्थानिक नागरिकांनी घेतली आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव द्यावे, अशी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाच्या नामकरणाचा वाद निर्माण झाला आहे. तर बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याबाबत सिडकोने प्रस्थाव मंजूर केला असल्याचे राऊत यांनी सांगितले.

'शिवसेनेनला दि.बा.पाटीलांबद्दल आदर' -

नवी मुंबई हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. या विमानतळाला हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, याबाबतचा प्रस्थाव सिडकोने मंजूर केला आहे. बऱ्याच लोकांची तशी मागणी आहे. शिवसेनेनला दि.बा.पाटील यांच्याबद्दल आदर आहेच, ते शिवसेनेतच होते. त्यांचा योग्य सन्मान करण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले असल्याचेही ते म्हणाले. तसेच सिडकोने जो ठराव केला आहे, त्यावर सरकार काय भूमिका घेते, त्यावर पुढचे अवलंबून असल्याचेही ते म्हणाले.

विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा आहे चर्चेत -

नवी मुंबई मधील विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव दिले जावे म्हणून मोर्चा काढण्यात आला आहे. आज (गुरुवार) रोजी स्थानिक नागरिकांनी मोर्चाही काढला. नवी मुंबई येथील विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नाव राहणार आहे. त्या विमानतळाची जागा जरी पनवेल, नवी मुंबईत असली तरी ते विमानतळ मुंबईच्या नावानेच ओळखले जाणार आहे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले होते. तर मुळात नवी मुंबईतील विमानतळ हे मुंबई विमानतळाचे एक्सटेन्शन आहे. त्यामुळे या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नावच असणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले आहे. यामुळे या विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा चर्चेला आला आहे.

हेही वाचा - २३४५ कोटींची बँकांची फसवणूक; उद्योगपती गौतम थापरविरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.