ETV Bharat / state

Illegal Mining case : नितेश राणेंची तक्रार, शिवसेनेच्या माजी जिल्हा परिषद सदस्याला कोट्यावधींचा दंड

author img

By

Published : Aug 5, 2022, 3:49 PM IST

Illegal Mining case kankavali
Illegal Mining case kankavali

शिवसेना माजी जिल्हा परिषद सदस्य आणि सिलिका वाळू व्यवसायिक संजय आग्रे यांना कणकवली तहसिलदारांनी कोट्यवाधींचा दंड ठोठावला ( kankavali tahsildar Penalty has shivsena leader sanjay agre ) आहे. नितेश राणे याप्रकरणी तक्रार दिली होती.

सिंधुदुर्ग - कणकवली तालुक्यातील वाघेरी येथील मे.सिद्धिविनायक मायनींग कंपनीकडून सिलिका मायनींग बेकायदेशीर उत्खनन करण्यात येत होते. याप्रकरणी खनिकर्म विभागाने दिलेल्या अहवालानुसार ३० कोटी ७४ लाखांचा दंड फोंडाघाट येथील शिवसेना माजी जिल्हा परिषद सदस्य आणि सिलिका वाळू व्यवसायिक संजय आग्रे यांना कणकवली तहसीलदार आर.जे.पवार यांनी ठोठावला ( kankavali tahsildar Penalty has shivsena leader sanjay agre ) आहे. त्याबाबत भाजपा आमदार नितेश राणे यांनी जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांकडे तक्रार केली ( nitesh rane complaint illegal mining case ) होती.

वाघेरी येथील सिलिका मायनिंग कंपनी बेकायदा सिलिका उत्खनन केल्याप्रकरणी तात्पुरती उत्खननास स्थगितीची कारवाई झाली आहे. कणकवली- वाघेरी येथे मे. सिद्धिविनायक मायनिंग कंपनीने बेकायदेशीर रित्या सिलिका उत्खनन केले होते. शिवसेनेचे फोंडाघाट येथील माजी जिल्हा परिषद सदस्य आणि सिलिका वाळू व्यवसायिक संजय आग्रे आणि त्यांच्या पत्नी संजना आग्रे हे कंपनीचे भागीदार आहेत. त्यांच्यावर ही दंडात्मक कारवाई करण्यात करण्यात आली आहे.

सिध्दीविनायक मायनिंग करिता भागीदार संजय वसंत आग्रे आणि त्यांच्या पत्नी संजना संजय आग्रे फोडाघाट यांची कणकवली तालुक्यातील वाघेरी येथे सिलिका सॅण्ड आणि क्वार्टझाईट या गौण खनिजाची खाण ५ वर्षे भाडेपट्टा मुदतीवर देण्यात आली आहे. आग्रे यांनी खाणपट्टयाबाहेरील खनिजाचा साठा करून त्याची विक्री करत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. दरम्यानच्या, कालावधी २८ मे २०२२ रोजी झालेल्या पाहणीत वरिष्ठ भूवैज्ञानिक, उपसंचालक यांचे प्रादेशिक कार्यालय, भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय कोल्हापूर यांनी संयुक्त रित्या प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यात संजय आग्रे दोषी आढळले होते.

तर खाणपट्टे धारकाने त्याच्या खाणपट्टयामधून आतापर्यंत विक्री केलेले, तसेच आताच्या परिस्थितीतील खाणपट्टयामध्ये असलेले असे एकूण १ लाख, २१ हजार ९८१ मे. टन ऐवढे सिलीका सॅण्ड आणि क्वार्टझाईट हे गौण खनिज अवैध रित्या उत्खनन केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संजय आग्रे यांचे वर महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ च्या तरतुदी अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. त्याबाबचे आदेश तहसिलदार कणकवली यांना २८ जुलै २०२२ चे पत्रान्वये कळवले होते. त्यानुसार ही कारवाई झाली आहे.

हेही वाचा - Ujjwal Nikam : उज्वल निकम यांची 'नंदनवन'वरती मुख्यमंत्र्यांशी भेट; म्हणाले, 'कितीही युक्तीवाद केला तरी...'

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.