ETV Bharat / state

'चिपी विमानतळाचे काम दळभद्री ''आयआरबी''ला देऊन राणेंनी वाट लावली'

author img

By

Published : Apr 10, 2021, 3:06 PM IST

Updated : Apr 10, 2021, 3:17 PM IST

खासदार विनायक राऊत
खासदार विनायक राऊत

कोकणचे सम्राट म्हणवणाऱ्यांनी दळभद्री आयआरबी कंपनीचे लाड पुरवण्यासाठी अशा प्रकारचा ठेकेदार नियुक्त केला. तेच काम एमआयडीसीने केले असते तर शिर्डीसारखे विमानतळ सुरू झाले असते, अशा शब्दात खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर निशाणा साधला आहे.

सिंधुदुर्ग - चिपी विमानतळाच्या रखडलेल्या कामावरून शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपा खासदार नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दुर्दैवाने कोकणचे सम्राट म्हणवणाऱ्यांनी दळभद्री आयआरबी कंपनीचे लाड पुरवण्यासाठी अशा प्रकारचा ठेकेदार नियुक्त केला. तेच काम एमआयडीसीने केले असते तर शिर्डीसारखे विमानतळ सुरू झाले असते, अशा शब्दात खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा - नारायण राणे यांना काही काम धंदा उरलेला नाही, विनायक राऊतांचा घणाघात

...तर एमआयडीसी चिपी विमानतळ ताब्यात घेईल

विनायक राऊत पुढे म्हणाले, की नारायण राणे यांनी आयआरबीचे लाड पुरवण्यासाठी त्यांना ठेका दिला आणि संपूर्ण विमानतळाची वाट लावण्याचे काम केले. आता मागे लागून ते काम आम्ही पूर्ण करून घेत आहोत. डीजीसीएच्या सूचनेप्रमाणे रन-वेचे काम झाले नाही म्हणून त्याला डीजीसीएने लायसन्स दिले नाही. मात्र आता आयआरबीला शेवटची वॉर्निंग दिलेली आहे. आता जर डीजीसीएच्या सूचनेप्रमाणे रन-वेचे काम झाले नाही, तर एमआयडीसीला चिपी विमानतळ आपल्या ताब्यात घेण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. कोणत्याही परिस्थितीत सुरक्षिततेच्या दृष्टीने तडजोड केली जाणार नसल्याचे म्हणत आयआरबीला शेवटचा इशारा दिला आहे.

हेही वाचा - 'चिपी विमानतळाला आजही परवाना नाही, खासदार राऊत यांनी जनतेची चेष्टा थांबवावी'

'एका महिन्यात काम पूर्ण होईल'

एका महिन्यात विमानतळाचे काम पूर्ण होईल, असे सांगतानाच जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत विमानतळ सुरू होणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले. आयआरबीला स्पष्ट सांगण्यात आले आहे, की काम पूर्ण झाले नाही तर एमआयडीसी चिपी विमानतळ प्रकल्पाचा ताबा घेईल. मात्र, हे करताना विमानतळाच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही विनायक राऊत यांनी स्पष्ट केले.

Last Updated :Apr 10, 2021, 3:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.