ETV Bharat / state

परदेशी लोकांना लस द्यायची आन् आपल्या देशातील लोकांना मारायचं हा केंद्र सरकारचा धंदा

author img

By

Published : Apr 17, 2021, 4:43 PM IST

Updated : Apr 17, 2021, 5:24 PM IST

विनायक राऊत
विनायक राऊत

परदेशातील लोकांना आपले काही तरी देण घेणे लागत म्हणून त्यांना लस द्यायचे आणि आपल्या देशातील लोकांना मारायचं हा केंद्र सरकारचा धंदा आहे, अशा शब्दात शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांची केंद्र सरकारवर टीका केली आहे.

सिंधुदुर्ग - परदेशातील लोकांना आपले काही तरी देण घेणे लागत म्हणून त्यांना लस द्यायचे आणि आपल्या देशातील लोकांना मारायचं हा केंद्र सरकारचा धंदा आहे, अशा शब्दात शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांची केंद्र सरकारवर टीका केली आहे.

माहिती देताना खासदार राऊत

कोरोना लस व ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. परदेशातील लोकांना आपले काही तरी देण-घेणे लागते म्हणून त्यांना व्हॅक्सीन द्यायचे आणि आपल्या देशातल्या लोकांना मारायचे हा केंद्र सरकारचा धंदा चालू होता, अशी टीका राऊत यांनी केली आहे. रेमडेसिवीरची निर्यात ताबडतोब थांबवण्याची आवश्यकता होती ती बऱ्याच दिवसानंतर थांबवली. त्यामुळे परदेशात जाणारी रेमडेसिवीर आता देशात यायला सुरूवात होईल, असेही ते यावेळी म्हणाले.

महाराष्ट्रात हवाई वाहतुकीद्वारे ऑक्सिजन पुरवठा करावा

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानी पंतप्रधानांकडे ऑक्सिजनची मागणी केली. पंतप्रधानांनीही ऑक्सिजन द्यायची तयारी दाखवली. मात्र, ती कुठून तर बंगालमधून म्हणजे बंगाल ते मुंबई हा जर प्रवास बघीतला तर कशा पद्धतीने ते ऑक्सिजन देणार आहेत हे तूमच्या सर्वाच्या लक्षात येईल. म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे जी मागणी केलेली आहे तीचा पंतप्रधानांनी सहानभुतीपूर्वक माणूसकीच्या दृष्टीने विचार करून हवाई वाहतूकीद्वारे प्राणवायू हा आपल्या महाराष्ट्रात, मुंबईत पाठवण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

औषधांच्या तुटवड्यामुळे रुग्णांना फटका

राज्यात एकीकडे कोरोना रुग्ण वाढत असताना दुसरीकडे औषधांचा तुटवडा जाणवत आहे. महाराष्ट्रात रुग्णांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. तर दुसरीकडे रेमडेसिवीरचा पुरवठाही तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना याचा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी केंद्र सरकारला फटकारताना काही सूचनाही केल्या आहेत.

हेही वाचा - 'मेवा लुबाडणाऱ्या नारायण राणेंनी सरकारवर टीका करण्याचे धारिष्ठ करू नये'

Last Updated :Apr 17, 2021, 5:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.