ETV Bharat / state

'नाणार रिफायनरी प्रकरणी शिवसेनेचे नाव काढूच नका, त्यांचा पैसे कमावणे हा एकमेव धंदा'

author img

By

Published : Aug 9, 2020, 11:45 AM IST

नाणार प्रकल्पाबाबत आमची भूमिका शिवसेनेसारखी नाही. नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पा बद्दल जनतेची जी भूमिका असेल ती आमची भूमिका राहील, स्थानिक जनता ज्या दिशेने जाईल, त्या दिशेने आम्ही जाणार असे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी येथे सांगितले.

Narayan rane comment on shivsena over nanar
Narayan rane comment on shivsena over nanar

सिंधुदुर्ग - नाणार रिफायनरी प्रकरणी शिवसेनेचे नावच काढू नका, त्यांचा पैसे कमावणे हा एकमेव धंदा आहे. काल काय बोलले आणि आज काय बोलतील ते सांगू शकत नाही. ८० टक्के पाठिंबा म्हणजे तो शंभर टक्के झालाच. त्यामुळे शिवसेनेचे हे घुमजाव आहे. स्थानिक जनतेची ही फसवणूक आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे शिवसेनेवर केली आहे. अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या विजयदुर्गाची पाहणी करण्यासाठी ते आले होते, त्यावेळी त्यांनी नंतर प्रकल्पावरून सेनेवर निशाणा साधला.

राणे पुढे म्हणाले, नाणार प्रकल्पाबाबत आमची भूमिका शिवसेनेसारखी नाही. नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पा बद्दल जनतेची जी भूमिका असेल ती आमची भूमिका राहील, स्थानिक जनता ज्या दिशेने जाईल, त्या दिशेने आम्ही जाणार असे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी येथे सांगितले.

नाणार रिफायनरी प्रकरणी सध्या कोकणात मोठे वादळ उठले आहे. शिवसेना- भाजपा पक्षाचे नेते एकमेकांवर आरोपाच्या फैरी झाडात आहेत. देवगड पंचायत समितीने नाणार रिफायनरी समर्थनार्थ ठराव पास केला असून त्याला शिवसेनेच्या एकमेव सदस्याने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणाला आता चांगलाच रंग चढला आहे. तर शिवसेनेची या प्रकल्पाबाबत नेमकी भूमिका काय असा प्रश्न देवगड वासीयांसमोर निर्माण झाला आहे.

दरम्यान, खासदार नारायण राणे यांनी आपण जनतेच्या भूमिकेसोबत राहणार असल्याचे सांगत नानार रिफायनरीचा चेंडू तसा जनतेच्या कोर्टात टोलवलेला दिसतो. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेला जनतेतून कसा प्रतिसाद मिळतो याबरोबरच नाणार रिफायनरी प्रकल्पाला येथील जनता कसा प्रतिसाद देते हे येणाऱ्या काळात समजेल.

यावेळी आमदार नितेश राणे, माजी.आमदार आजीत गोगटे, जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे,तालुका अध्यक्ष रवींद्र पाळेकर,जिल्हा परिषद सभापती सावी लोके, सभापती सुनील पारकर, माजी सभापती संजय बोंबडी, सरपंच प्रसाद देवधर, नगराध्यक्ष प्रणाली माने, तहसीलदार मारुती कांबळे, आदींसह बहुसंख्य पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.