ETV Bharat / state

Nitesh Rane : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री कोणीही मला विचारल्याशिवाय...- नितेश राणे

author img

By

Published : Dec 12, 2022, 7:45 PM IST

Nilseh Rane
निलेश राणे

आमदार नितेश राणे नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी मोठे वक्तव्य ( MLA Nitesh Rane statement ) केले आहे. ते म्हणाले की, "माझ्या विचाराचा सरपंच आला नाही तर एकही रुपयाचा निधी मिळणार नाही. पालकमंत्री, मंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री मला विचारल्याशिवाय निधी देणार नाहीत."

आमदार निलेश राणे बोलताना

सिंधुदुर्ग: आमदार नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी वैभववाडी येथे केलेल्या वक्तव्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार झाल्यानंतर त्यांनी आता पुन्हा एकदा त्याच पद्धतीचे विधान ( MLA Nitesh Rane statement ) केले आहे. तुम्ही ही धमकी समजा, सर्व निधी माझ्या हातात आहे. पालकमंत्री, मंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री मला विचारल्याशिवाय निधी देणार नाहीत. नितेश राणेंच्या विचाराचा सरपंच आला नाही तर एकही रुपयाचा निधी मिळणार नाही, असा थेट दम त्यांनी ग्रामपंचायत निवडणूक ( Gram Panchayat election ) प्रचारादरम्यान दिला आहे.

नितेश राणेंची धमकी? कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे आज भाजपा आमदार नितेश राणे यांनी सभा घेतली. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी माझ्याच विचाराचा सरपंच या गावात बसला पाहिजे, असे म्हटले आहे. या गावात आपण चांगला उमेदवार दिलेला आहे. या ठिकाणचा सरपंच पदासाठी दिलेला उमेदवार असा आहे जो तुमच्या गावचा विकास करेल, माझ्याशी बोलेल, माझ्याशी चर्चा करेल, लागलं तर राणे साहेब केंद्र सरकारचे प्रतिनिधी मंत्री म्ह्णून तिथे बसले आहेत त्यांच्याशी बोलेल, आमच्या रवी चव्हाणजींशी पालक मंत्री म्हणून त्यांच्याशी बोलेल, आणि अशा पद्धतीने तुमच्या गावाचा विकास करेल.

आपल्या विचारांचा सरंपच: ते पुढे म्हणाले की, आपले नांदगाव गाव हे हायवेला लागून असलेले गाव आहे. भविष्यामध्ये आता येणाऱ्या काळामध्ये, महिन्यांध्ये जेव्हा इथे अजून रस्त्याच्या दोन्ही बाजूने जेव्हा सगळा साइड रोड बनेल आणि तिथे दोन्ही बाजूने जेव्हा विकास होईल. तेव्हा इकडे आपल्या विचारांचा सरपंच असणे फार गरजेचे आहे. म्हणून या गोष्टी आपण मतदार म्हणून आणि कार्येकर्ते म्हणून लोकांर्यंत पोचावा. आपल्याकडे लपवाछपवी नाही. राणे साहेबांच्या तालिमीत तयार झालेले आम्ही विद्यार्थी आहोत. पोटात एक आणि वोटात एक असे नाही. चुकुनपण इथे माझ्या विचाराचा सरपंच आला नाही तर मी एकही रुपयाचा निधी देणार नाही एवढी काळजी मी निश्चित पद्धतीने मी घेईन. म्हणजे आता हे तुम्ही धमकी समजा, काहीही समजा, असा धमकीवजा इशारा त्यांनी दिला.

अन्याथा विकास होणार नाही: मतदान करताना एक लक्षात घ्या, कारण का सगळा निधी आता माझ्या हातात आहे. जिल्हा नियोजनचा निधी असो की ग्रामविकासाचा निधी, २५/१५ चा निधी असो की केंद्र सरकारचा निधी असो मी सत्तेत असलेला आमदार आहे. म्हणून पालकमंत्री असो, जिल्हाधिकारी असो, संबंधित कुठलाही मंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, मुख्यमंत्री असो हे कोणीही मला विचारल्याशिवाय नांदगावमध्ये निधी देणार नाहीत. म्हणून हा विषय तुम्ही सरळ स्पष्ट समजून घ्या. नितेश राणेंच्या विचाराचा सरपंच इथे आला नाही तर इथे विकास होणार नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, वैभववाडी येथे बोलताना भाजपचा सरपंच निवडून द्या ५० लाखांचा निधी देतो, असे आमदार नितेश राणे यांनी वक्तव्य केले होते. तर त्या बाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार झाल्यानंतर भाजपचा सरपंच बसविण्यासाठी आम्ही साम दाम दंड भेदाचा वापर करू असे म्हणत आपल्याच वक्तव्याचे समर्थन केले होते. मात्र आता पुन्हा एकदा त्यांनी तसेच विधान केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.