ETV Bharat / state

चिपी विमानतळ 31 जानेवारीपूर्वी सुरू होणार - सुरेश प्रभू

author img

By

Published : Jan 9, 2021, 7:16 PM IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ 31 जानेवारीपूर्वी सुरू होईल अशी माहिती खासदा सुरेश प्रभू यांनी दिली. ते विमानतळाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी चिपी येथे आले होते.

Chipi Airport will start before January 31, Suresh Prabhu said
चिपी विमानतळ 31 जानेवारीपूर्वी सुरू होणार - सुरेश प्रभू

सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील चिपी विमानतळ ३१ जानेवरीपूर्वी सुरू होईल अशी माहिती माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभू यांनी म्हटले आहे. चिपी विमानतळ प्रकल्पाला त्यांनी भेट दिली यावेळी ते बोलत होते.

चिपी विमानतळ 31 जानेवारीपूर्वी सुरू होणार - सुरेश प्रभू

विमानतळ कामाचा घेतला आढावा -

वेंगुर्ला दौऱ्यावर असलेल्या सुरेश प्रभू यांनी आज मानव साधन विकास संस्थेच्या अध्यक्षा उमा प्रभू यांच्यासमवेत येथील चिपी विमानतळला भेट देऊन आयआरबी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतला. हे विमानतळ सुरू करण्यासाठी असलेल्या अडचणींची माहिती घेतली.

पर्यटनाचा एक विस्तृत आराखडा तयार -

चिपी विमानतळ लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी या खात्याच्या मंत्र्यांना मी सतत भेटत आहे. हे विमानतळ ३१ जानेवारी पूर्वी राज्य सरकारच्या सहकार्याने सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. पर्यटनाचा एक विस्तृत आराखडा मी तयार केला असून तो अमलात आणून पर्यटन कसे की ज्यामुळे पर्यटक येऊन याचा फायदा चिपी विमानतळला कसा होईल यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती सुरेश प्रभू यांनी चिपी येथे बोलताना दिली.

आधीच दिल्या आहेत विमानतळाच्या परवानग्या -

आपण मंत्री असताना या विमानतळाच्या सर्व परवानग्या दिलेल्या आहेत. या विमानतळावरून कमर्शिअल उड्डाण व्हावीत यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. या विमानतळावरून उड्डाण व्हावीत याकरता अलायन्स एअर विमान कंपनीने विमानाचे वेळापत्रक निश्चित करावे असे निर्देश दिले आहेत. विमानतळ सुरू होण्यापूर्वी या कंपनीची नियुक्ती केली असल्याचे ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.