ETV Bharat / state

संजय राऊत.. डॉ.पाटकरच्या मुलीशी आपले काय संबंध ? तिचा बाप कोण ? याचे रोखठोक उत्तर द्यावे, नितेश राणेंचा सवाल

author img

By

Published : Aug 29, 2021, 7:19 PM IST

Updated : Aug 29, 2021, 7:55 PM IST

narayan rane
narayan rane

दुसऱ्यांच्या मुलांबद्दल बोलण्यापेक्षा राऊत यांनी डॉ. पाटकरच्या मुलीशी आपले संबंध काय? तिचा बाप कोण ? याचे रोखठोक उत्तर द्यावे” असा खळबळजनक सवाल करत खासदार संजय राऊत यांच्या चारित्र्यावर भाजपा आमदार नितेश राणे यांनी थेट प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

सिंधुदुर्ग - “दुसऱ्यांच्या मुलांबद्दल बोलण्यापेक्षा राऊत यांनी डॉ. पाटकरच्या मुलीशी आपले संबंध काय? तिचा बाप कोण ? याचे रोखठोक उत्तर द्यावे” असा खळबळजनक सवाल करत खासदार संजय राऊत यांच्या चारित्र्यावर भाजपा आमदार नितेश राणे यांनी थेट प्रश्नचिन्ह उभे केले आहे. सामना वृत्तपत्रातून राणे कुटुंबियांवर वैयक्तिक पातळीवर केलेल्या टीकेला आमदार नितेश यांनी राणे स्टाईलने ट्विट करत उत्तर दिले आहे.

राऊत यांच्या रोखठोकवरून आमदार नितेश राणेंचे ट्विट -

सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या निलेश आणि नितेश या दोन्ही पुत्रांवर संजय राऊत यांनी टीका केली. त्याला प्रत्युत्तर देत आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून त्यांना जाब विचारला आहे.

narayan rane
नितेश राणे यांचे ट्विट
संजय राऊत यांनी रोखठोकमधून नेमके काय म्हटले आहे ? -
भारतीय जनता पक्षाची हळद लावलेला एक नवाकोरा आमदार देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर घाणेरडय़ा भाषेत जाहीर विधान करतो व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील त्यावर फक्त सारवासारवी करून अप्रत्यक्ष अशा बेतालपणास फूस देतात. हे कसले संस्कार? उद्धव ठाकरे व इतरांवर धोरणात्मक टीका करणे समजू शकतो. तो लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, पण राणे व त्यांची दोन्ही मुले राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या ठाकरे यांच्याविषयी जी भाषा वापरतात तो भाजपच्या नव्या संस्कृतीचा उदय आहे! राणे व त्यांच्या मुलांनी काँग्रेस पक्षात असताना नरेंद्र मोदी, वीर सावरकर यांच्याविषयी याच असभ्य भाषेचा वापर केला होता. घटनात्मक पदांवर बसलेल्या व्यक्तींचा एकेरी पद्धतीने अपमानास्पद उल्लेख करण्याचा अधिकार राणे व त्यांच्या मुलांना कोणी दिला? असा सवाल राऊत यांनी केला आहे.

हे ही वाचा -आता सीबीआयने अनिल देशमुखांबाबत आलेल्या बातम्या अन् व्हायरल रिपोर्टबाबत खुलासा करावा - नवाब मलिक

तुम्ही बिनबापाचे आहात काय?

राणे यांच्या राजकीय कारकीर्दीचे सगळय़ात जास्त नुकसान त्यांच्या मुलांनी केले आहे. टीका करणे व स्वीकारणे ही लोकशाहीची परंपरा आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे, पण ठाकऱ्यांपासून पवारांपर्यंत, राहुल गांधींपासून मोदींपर्यंत सगळय़ांचे ‘आईबाप’ काढणाऱ्या राणेंच्या मुलांनी त्यांच्या पिताश्रींचे नुकसान केले. एक दिवस हीच वेळ ते फडणवीस, चंद्रकांत पाटलांवर आणतील. हे राजकारण खरे नाही, असे फडणवीसांनी एकदा राणे यांना समोर बसवून समजावून सांगायला हवे. कारण फडणवीस यांचा उल्लेख राणे यांनी ‘मार्गदर्शक’ म्हणून केला आहे. राणे यांची मुले इतरांचे बाप ऊठसूट जाहीरपणे काढतात. तुम्ही बिनबापाचे आहात काय?’’ असा प्रश्न त्यांना एक दिवस भारतीय जनता पक्षाचे लोकच विचारतील तेव्हा ते काय उत्तर देतील?

हे ही वाचा - 100 कोटींची खंडणी वसुली प्रकरणात अनिल देशमुखांना क्लीनचिट ? सीबीआयकडून मोठा खुलासा

नितेश राणे यांचा पलटवार -

“दुसऱ्यांच्या मुलांबद्दल बोलण्यापेक्षा राऊत यांनी डॉ. पाटकरच्या मुलीशी आपले संबंध काय? तिचा बाप कोण ? याचे रोखठोक उत्तर द्यावे” असा खळबळजनक सवाल करत खासदार संजय राऊत यांच्या चारित्र्यावर भाजपा आमदार नितेश राणे यांनी थेट प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

Last Updated :Aug 29, 2021, 7:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.