ETV Bharat / state

Whale fish Vomit : महाबळेश्वरात व्हेल माशाची साडेसहा कोटींची उलटी जप्त, माजी नगरसेवकासह चौघांना अटक

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 26, 2023, 7:04 PM IST

Whale fish Vomit : सातारा वन विभागाने महाबळेश्वरमध्ये मध्यरात्री छापा मारून व्हेल माशाची साडेसहा किलोची उलटी जप्त केली आहे. (ambergris seized in Mahabaleshwar) याप्रकरणी महाबळेश्वरच्या एका माजी नगरसेवकासह चौघांना अटक करण्यात आली आहे.

Whale fish Vomit
Whale fish Vomit

सातारा Whale fish Vomit - सातारा वन विभागाने महाबळेश्वर-मेढा मार्गावर मध्यरात्री छापा मारून व्हेल माशाची साडेसहा किलोची उलटी जप्त केली आहे. व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करी प्रकरणी महाबळेश्वर नगरपालिकेच्या माजी नगरसेवकासह चौघांना अटक करण्यात आली आहे.(ambergris seized in Mahabaleshwar)

महाराष्ट्राच्या नंदनवनात शिकार आणि तस्करी - महाबळेश्वरला महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाते. अशा नंदनवनात आता वन्य प्राण्यांची शिकार आणि व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीचा प्रकार उघडकीस आला आहे. वन विभागाने जप्त केलेल्या उलटीचे वजन साडे सहा किलो आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत प्रति किलो एक कोटी प्रमाणे साडे कोटी रुपये इतकी आहे.

वन विभागाची धडाकेबाज कारवाई - व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करी प्रकरणी महाबळेश्वरचे माजी नगरसेवक प्रकाश रामचंद्र पाटील, संजय जयराम सुर्वे (रा. मेढा, ता. जावळी), अनिल अर्जुन ओंबळे (रा. बोंडारवाडी, ता. जावळी) आणि संतोष खुशालचंद्र जैन (रा. निसर्ग विहार, रत्नागिरी) यांना अटक करण्यात आली आहे. साताऱ्याच्या उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर रेंज फॉरेस्ट ऑफिसर महांगडे यांनी मध्यरात्री छापा मारून ही कारवाई केली आहे.



पूर्वीही घडली आहेत तस्करीची प्रकरणे - मे महिन्यातही अशाच प्रकारची व्हेल माशाच्या उलटीची तस्करी पकडण्यात आली होती. सातारा शहरात ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळीही चार तस्करांना अटक करण्यात आली होती. अलिकडेच आणखी एका घटनेत, पट्टेरी वाघाच्या कातड्याची व नख्यांची विक्री करण्यासाठी गेलेल्या महाबळेश्वरमधील तीन जणांना मुंबईतील एमएचबी कॉलनी पोलिसांनी मागील आठवड्यात बेड्या ठोकल्या होत्या. त्यांच्याकडून पट्टेरी वाघाचे लाखो रुपये किमतीचे कातडे आणि १२ नख्या, असा १० लाख ६० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

हेही वाचा..

  1. Whale vomit: साडेपाच कोटीचे अंबरग्रीस साताऱ्यात जप्त; कोल्हापूर, रत्नागिरीतील चौघांना अटक
  2. Pune Crime : 5 कोटींची व्हेल माशाची उलटी विक्री करणाऱ्याला ठोकल्या बेड्या, काय आहे प्रकरण?
  3. Ambergris Seized : तब्बल 10 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी जप्त, 5 जण ताब्यात
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.