ETV Bharat / state

साताऱ्यात नगररचनाकार आणि वैद्यकीय प्रतिनिधीची आत्महत्या

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 5, 2023, 8:02 PM IST

Etv Bharat
Etv Bharat

suicide सातारा शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. राजेश आत्माराम उथळे (वय ५४, रा. गुरूवार पेठ सातारा) आणि पुष्पराज राजेंद्र चौधरी (वय ४३, रा. शुक्रवार पेठ सातारा) अशी त्यांची नावं आहेत.

सातारा suicide - सातारा शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांनी काही कारणास्तव आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. राजेश आत्माराम उथळे (वय ५४, रा. गुरूवार पेठ सातारा) आणि पुष्पराज राजेंद्र चौधरी (वय ४३, रा. शुक्रवार पेठ सातारा), अशी त्यांची नावं आहेत. उथळे हे जिल्हाधिकारी कार्यालयात नगररचनाकार मूल्यांकन तज्ज्ञ तर चौधरी हे वैद्यकीय प्रतिनिधी होते.

राहत्या घरीची केली आत्महत्या - राजेश आत्माराम उथळे यांनी सोमवारी राहत्या घरी आत्महत्या केली. १९९३ साली ते सहाय्यक नगररचनाकार म्हणून नोकरीला लागले होते. नंतर २०२१ मध्ये त्यांना नगररचनाकार म्हणून पदोन्नती मिळाली. सध्या ते जिल्हाधिकारी कार्यालयात नगररचनाकार मूल्यांकन तज्ज्ञ म्हणून कार्यरत होते. महाबळेश्वर, पाचगणी येथे त्यांनी काम केलं होतं. या घटनेमुळे सातारा शहरात एकच खळबळ उडाली. कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी, नातेवाईक, मित्र परिवाराने त्यांच्या घरी धाव घेतली. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

वैद्यकीय प्रतिनिधीची आत्महत्या - साताऱ्यातील शुक्रवार पेठेत राहणाऱ्या पुष्पराज राजेंद्र चौधरी यांनीही राहत्या घरी आत्महत्या केली. ते वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम करत होते. त्यांच्या आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नाही. एकाच दिवशी दोन आत्महत्यांच्या घटनांनी साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे.

भिक्षेकरी गृहात एकाचा मृत्यू - सातारा शहर पोलीस ठाण्यात या दोन्ही आत्महत्येच्या घटनांची नोंद करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान, साताऱ्यातील (सदरबझार) पुरुष भिक्षेकरी गृहात झोपेतच एकाचा मृत्यू झाला आहे. नारायण सोपय्या (वय ४५), असं मृताचं नाव आहे. या घटनेची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

कोणत्यातरी विवंचनेतून किंवा त्रास तसंच ताणातून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल लोक उचलतात. त्यांना वेळीच मानसिक आधार मिळणं गरजेचं आहे. जर असा आधार मिळाला किंवा योग्य मार्गदर्शन तसंच समुपदेशन मिळालं तर त्यापासून व्यक्ती परावृ्त्त होऊ शकते. त्यामुळे जिल्हा स्तरावर असणाऱ्या अशा सुविधांची वाढ करण्याची गरज आहे. तसंच त्याबाबत जनजागृतीचीही गरज या घटनांमुळे अधोरेखित होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.