ETV Bharat / state

Satara Crime News : कोयना जलाशयात बुडालेल्या तरूणाचा मृतदेह तीन दिवसांनी तरंगला पाण्यावर

author img

By

Published : Dec 30, 2022, 5:15 PM IST

Updated : Dec 30, 2022, 5:53 PM IST

Koyna Dam In Satara
मृत संकेत काळे

मित्रांसह कोयना जलाशयावर ( body of the drowned youth in Koyna Dam ) फिरायला आलेल्या तरुणाचा जलाशयात बुडून मृत्यू झाला. मात्र या तरुणाचा मृतदेह आढळून येत नव्हता. गेल्या तीन दिवसापासून त्याचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते. मात्र तीन दिवसानंतर त्याचा मृतदेह जलाशयावर ( Koyna Dam In Satara ) आढळून आला. संकेत काळे असे त्या जलाशयात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

सातारा - कोयना जलाशयात बुडालेल्या ( body of the drowned youth in Koyna Dam ) वाठार (ता. कराड) येथील संकेत काळे या तरुणाचा मृतदेह शुक्रवारी सकाळी पाण्यावर तरंगताना ( Koyna Dam In Satara ) आढळला. गेल्या तीन दिवसांपासून ट्रेकर्सकडून त्याचा शोध सुरू होता. संकेतचा मृतदेह पाहून कुटुंबीयांनी हंबरडा फोडला.

मित्रांसोबत पर्यटनासाठी आला होता संकेत मित्रांसोबत पर्यटनासाठी गेल्यानंतर कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात पोहताना संकेत काळे हा पाण्यात बुडाला होता. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली होती. त्यानंतर संकेतचा शोध घेतला जात होता. मात्र तो आढळून न आल्यामुळे महाबळेश्वर ट्रेकर्स, आमदार शिवेंद्रराजे ट्रेकर्स आणि स्थानिक प्रशासन गेल्या तीन दिवसापासून त्याचा शोध घेत होते. अखेर तिसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह आढळला.

कुटुंबीयांचा मन हेलावणारा आक्रोश कुटुंबीयांना धक्का बसेल म्हणून संकेत काळे पाण्यात ( Koyna Dam In Satara ) बुडाल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली नव्हती. दुसऱ्या दिवशी कुटुंबीयांना घटना समजताच सर्व कुटुंबीय तातडीने बामणोली म्हावशी येथे दाखल झाले होते. दोन दिवस सर्वजण जलाशयाच्या काठावर ( The body of the drowned youth in Koyna Dam ) बसून होते. आज सकाळी मृतदेह सापडल्यानंतर कुटुंबीयांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि लहान मुलगी असा परिवार आहे.

Last Updated :Dec 30, 2022, 5:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.