ETV Bharat / state

"भारत-चीन सीमा वादावर राजकारण नकोच"

author img

By

Published : Jun 27, 2020, 2:41 PM IST

गलवान भागामध्ये घडलेली घटना म्हणजे केंद्रीय संरक्षण मंत्रालयाचे अपयश, असे आपण म्हणू शकत नाही. संरक्षण मंत्रालयावर आरोप करणे सुद्धा योग्य नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

sharad pawar
शरद पवार

सातारा - भारत-चीन संघर्ष हा गंभीर मुद्दा आहे. गलवान भागामध्ये घडलेली घटना म्हणजे केंद्रीय संरक्षण मंत्रालयाचे अपयश, असे आपण म्हणू शकत नाही. संरक्षण मंत्रालयावर आरोप करणे सुद्धा योग्य नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. ते सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच त्यांनी आजच्या घडीला चीनने भारताच्या जमीन बळकावली असेल मात्र, याआधी सुद्धा चीनने खूप वेळा जमिनीवर कब्जा केला असल्याचे म्हटले आहे.

राष्ट्राच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आता राजकारण नको. भारत-चीन युद्ध होण्यासारखी परिस्थिती नाही. गलवान भागातील रस्ता आपला आहे. फायरिंग न करण्याचा करार असतानासुद्ध चीनने तो करार मोडून रस्त्यावर अतिक्रमण केले असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहेत.

पवार म्हणाले की, भारत-चीन युद्ध होईल असे वाटत नाही. त्यांनी खुरापत काढली. तिथला रस्ता आपण काढतोय तो आपल्या हद्दीत आहे. सियाचिन आपला भाग आहे. म्हणून तो रस्ता केला आहे. त्यांची लोक रस्त्यावर येतात म्हणून धर पकड सुरु आहे. 1993 साली हिमालय बॉर्डर वर सैन्य कमी करण्याचा निर्णय झाला होता. नरसिंग रावांनी करार केला होता. दोन्ही देशानी बंदुकीचा वापर करायचा नाही असा करार झाला.

चीनच्या कुरापती वाढल्या, पण संरक्षण मंत्र्यांचं अपयश नाही. चीन कुरापत नक्कीच करत आहे. आपला रस्ता आपल्या हद्दीत घेण्याचा मुद्दा आहे. आपल्या भागात जाण्यासाठी रस्ता तयार केला, सियाचीन भागात महत्वाचा रस्ता आहे. 1993 मध्ये संरक्षण मंत्री असताना मी चीनला गेलो होतो. त्यावेळी बॉर्डरवरील सैन्य कमी करण्यावर चर्चा झाली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.