ETV Bharat / state

Satara Crime News : पंकजा मुंडेंच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेत चोरट्यांची चांदी; 15 तोळ्यांचे दागिने केले लंपास

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 7, 2023, 1:44 PM IST

Satara Crime News
भाजप नेत्या पंकजा मुंडे

Satara Crime News : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेत गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी दागिने चोरी केले. यामुळे ही शिवशक्ती परिक्रमा यात्रा कार्यकर्त्यांना चांगलीच महागात पडली आहे.

सातारा : Satara Crime News: पंकजा मुंडे ( Bjp leader Pankaja Munde ) यांची राज्यात सध्या शिवशक्ती परिक्रमा यात्रा (Shiv Shakti Yatra) सुरू आहे. ही परिक्रमा यात्रा फलटण शहरात दाखल झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने क्रांतिसिंह नाना पाटील चौकात यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले. स्वागतासाठी पंकजा मुंडे यांचा ताफा थांबताच कार्यकर्त्यांनी गाडीभोवती गर्दी केली. याच गर्दीचा फायदा उचलत अज्ञात चोरट्याने भाजपा डॉक्टर सेलचे फलटण शहराध्यक्ष सुभाष गुळवे यांच्या गळ्यातील चार तोळ्याची चैन, कार्यकर्ते महादेव कदम यांची तब्बल साडेदहा तोळ्याची चैन तसेच पत्रकार पोपटराव मिंड यांच्या गळ्यातील एका तोळ्याची चैन लंपास (Thieves stole jewellery) करून चोरटे पसार झाले.

परिक्रमा यात्रा पडली महागात : (Satara Crime) परिक्रमा यात्रा पुढे गेल्यानंतर दागिन्यांची चोरी झाल्याचे कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच याची माहिती पोलीसांना दिली. (Pankaja Munde Shiv Shakti Yatra) पोलिसांनी चोरट्याचा शोध घेतला, मात्र चोरटे सापडले नाही. यात्रेदरम्यान कार्यकर्त्यांनी काढलेले फोटो, चित्रीकरण आणि सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलीसांनी चोरट्यांचा शोध घ्यायला सुरूवात केली आहे. (satara police) यामुळे शिवशक्ती परिक्रमा यात्रा भाजपच्या डॉक्टर सेलच्या शहराध्यक्षासह कार्यकर्त्यांना चांगलीच महागात पडली आहे.

याआधी कार्यकर्त्यांच्या दागिन्यांवर डल्ला : ( Satara News ) राजकीय मेळावे, सभा, निवडणूक, मतमोजणी अशा ठिकाणच्या गर्दीचा फायदा घेऊन चोरटे दागिने लंपास करतात. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक निकालावेळी देखील चोरट्यांनी अनेक कार्यकर्त्यांच्या दागिन्यांवर डल्ला मारला होता, मात्र तेव्हा स्थानिक गुन्हे शाखेने तपास करत चोरट्यांना जेरबंद केले होते.

हेही वाचा -

  1. Maratha Reservation : मराठा आरक्षण न्यायालयात का टिकू शकलं नाही? पंकजा मुंडे म्हणाल्या...
  2. Pankaja Munde On Maratha Reservation : मराठा आंदोलनाबाबत चौकशी झाली पाहिजे - पंकजा मुंडे
  3. New Appointments of BJP : विनोद तावडे राष्ट्रीय महामंत्री तर पंकजा मुंडे, विजया रहाटकर राष्ट्रीय सचिव
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.