ETV Bharat / state

Satara Crime News: सातारा एलसीबीची रेकॉर्ड ब्रेक कारवाई; १६ गुन्ह्यांमधील ६६ तोळ्याचे दागिने जप्त

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 18, 2023, 1:22 PM IST

Satara Crime News
१६ गुन्ह्यांमधील ६६ तोळ्याचे दागिने जप्त

Satara Crime News : सातारा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारासह दोघांना जेरबंद करत घरफोडीचे १६ गुन्हे उघडकीस आणले (Satara Crime) आहेत. त्यांच्याकडून चोरीच्या गुन्ह्यांमधील ६६ तोळ्याचे दागिने जप्त केले आहेत.

सातारा : Satara Crime News : सातारा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला जेरबंद करत घरफोडीचे १६ गुन्हे उघडकीस (Satara Crime) आणले आहेत. तपासादरम्यान, आरोपीने एका दरोड्याची देखील कबुली दिली असून या सर्व गुन्ह्यातील सोन्या-चांदीचे दागिने मिळून तब्बल ४० लाख ३५ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. एलसीबीची (LCB Action In Satara) आतापर्यंतची ही सर्वात मोठी कामगिरी ठरली आहे.



पोलिसांनी पाठलाग करून आरोपीला पकडले : सातार्‍याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी एलसीबीच्या पथकाला जिल्ह्यातील घरफोडी आणि चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी उपनिरीक्षक पतंग पाटील, विश्वास शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केले होते. पोलीस रेकॉर्डवरील सराईत आरोपी महेश उर्फ म्हावडया मंगेश काळे याने कोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकल्याची माहिती, पोलीस निरीक्षक देवकर यांना खबर्‍याकडून मिळाली. पोलिसांनी फलटणमधील नाना पाटील चौकात पाठलाग करून पकडले.



सराईत आरोपीकडून 16 गुन्ह्यांची उकल : पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपी महेश काळे याने दरोडा आणि घरफोडीच्या 16 गुन्ह्यांची कबुली दिली. तसेच ऋतुराज भावज्या शिंदे, कोहिनूर जाकिर काळे, चंदेक लक्ष्मण शिंदे, राजश्री वंदेक शिंदे, अभय काळे, अतिक्रमण काळे यांच्या मदतीने दरोडा टाकल्याची कबुली दिली. या गुन्ह्यात महेश काळे आणि ऋतुराज भाज्या शिंदे यांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने महेश काळेला ६ दिवस आणि ऋतुराज शिंदेला ५ दिवस पोलीस कोठडी सुनावली.



६६ तोळ्याचे सोन्याचे दागिने जप्त : आरोपींनी दरोडा, घरफोड्या करून चोरलेल्या मुद्देमालापैकी 66 तोळ्याचे सोन्याचे दागिने (किंमत 40 लाख 10 हजार रूपये), 25 हजार रूपये किंमतीचे चांदीचे दागिने (किंमत 25 हजार रूपये), असा एकूण 40 लाख 35 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या रेकॉर्डब्रेक कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी एलसीबीच्या पथकाचे खास अभिनंदन केले आहे. तसेच नागरीकांमधून एलसीबीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.



एका वर्षात पावणे दोन कोटींचा मुद्देमाल हस्तगत : स्थानिक गुन्हे शाखेने एक वर्षाच्या कार्यकाळात (नोव्हेंबर २०२२ पासून आजअखेर) दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, मोटरसायकल चोरीसह एकूण ६७ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिण्यांपैकी १ कोटी ८३ लाखांचे सव्वा दोन किलो सोन्याचे दागिने (२३५ तोळे) हस्तगत केले आहेत. एलसीबीची ही कामगिरी जिल्हा पोलीस दलाच्या यशाचा आलेख उंचावणारी आहे.

हेही वाचा -

  1. Riots in Satara : सोशल मीडियावर टाकलेल्या वादग्रस्त पोस्टच्या वादातून साताऱ्यात दंगल; एकाचा मृत्यू, इंटरनेट सेवा बंद
  2. Satara Bribe News : रस्त्याच्या कामाचे बील काढण्यासाठी 30 हजाराची लाच घेताना नगरअभियंत्यास रंगेहाथ पकडले
  3. Satara Crime News : एसटी स्टँडवर दागिने चोरणाऱ्या लातूरच्या महिलांना अटक; 10 तोळे दागिने हस्तगत, 16 गुन्हे उघड
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.