ETV Bharat / state

Satara District Central Bank Election 2021 - सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील

author img

By

Published : Dec 7, 2021, 9:43 AM IST

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील यांची निवड
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील यांची निवड

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील तर उपाध्यक्षपदी अनिल देसाई यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ( Central Bank Election 2021 Maharashtra) विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी या दोघांची नावे जाहीर केली. ( Satara District Central Bank Election 2021) निवडीच्या घोषणेनंतर वाई तालुक्यातील नितीन पाटील त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीकडे साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.

सातारा - सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील तर उपाध्यक्षपदी अनिल देसाई यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी या दोघांची नावे जाहीर केली. ( Nitin Patil as Chairman of Satara District Central Co-operative Bank ) निवडीच्या घोषणेनंतर वाई तालुक्यातील नितीन पाटील त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीकडे साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. सकाळपर्यंत या पदासाठी बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजें भोसले ( MLA Shivendrasinharaje Bhosle SataraBank Election 2021) यांची फेरनिवड होईल अशी चर्चा होती. ( Satara District Central Bank Election 2021 Sharad pawar) मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदासाठी नितीन पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

प्रितिक्रिया देताना निवनियुक्त अध्यक्ष नितीन पाटील
अनिल देसाई उपाध्यक्ष

उपाध्यक्ष पदासाठी अनिल देसाई यांचे नाव अंतिम केले. ( Satara District Central Bank Election 2021 ) बँकेचा अध्यक्ष- उपाध्यक्ष निवडीसाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी या दोघांची नावे जाहीर केली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सहकार पॅनेलने निर्विवाद वर्चस्व मिळवले. ( Ramraje Naik Nimbalkar on Satara District Central Bank Election 2021 ) त्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता ताणली होती. राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेची ओळखली जाणारी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी माजी खासदार कै. लक्ष्मणराव पाटील यांचे पुत्र व आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांची निवड झाली. जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयांमध्ये सर्व संचालकांची नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी बैठक घेण्यात आली. ( MP Udayan Raje Bhosale Satara District Central Bank Election 2021 ) यामध्ये खासदार उदयनराजे भोसले, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, माजी अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांसह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

राष्ट्रवादीच्या संचालकास अध्यक्षपद द्यावे

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जिल्हा बँकेच्या आवारात उपस्थित होते. मात्र, संचालकांच्या बैठकीत नितीन पाटील यांचे नाव जाहीर करण्यात आले. गेले काही दिवस शिवेंद्रसिंहराजे व सत्यजित पाटणकर आणि राजेंद्र राजपुरे यांची नावे चर्चेत होती. तर राष्ट्रवादीच्या संचालकास अध्यक्षपद द्यावे अशी मागणी जोर धरत होती. त्यामुळे खासदार शरद पवार यांनी पक्षाच्या संचालकास अध्यक्ष करून साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मागणी पूर्ण केली. तर अनिल देसाई यांची दुसऱ्यांदा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.

हेही वाचा - ED probe of Anil Deshmukh Son: ऋषिकेश देशमुख यांना न्यायालयाचा दिलासा नाही; 9 डिसेंबरला पुढील सुनावणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.