राज्यपाल कोश्यारी, दानवेंच्या निषेधार्थ उदयनराजे समर्थकांनी महामार्गावर पेटवले टायर
Updated on: Dec 5, 2022, 11:04 PM IST

राज्यपाल कोश्यारी, दानवेंच्या निषेधार्थ उदयनराजे समर्थकांनी महामार्गावर पेटवले टायर
Updated on: Dec 5, 2022, 11:04 PM IST
वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve ) यांच्या निषेधार्थ खासदार उदयनराजे भोसले ( MP Udayanaraje Bhosale ) यांच्या समर्थकांनी महामार्गावर टायर पेटवून वाहतूक रोखली. यामुळे अर्धा तास महामार्ग ठप्प होता.
सातारा - छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ( Chhatrapati Shivaji Maharaj ) वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve ) यांच्या निषेधार्थ रास्तारोको कारण्यात आला. खासदार उदयनराजे भोसले ( MP Udayanaraje Bhosale ) यांच्या समर्थकांनी महामार्गावर टायर पेटवून वाहतूक रोखली. यामुळे अर्धा तास महामार्ग ठप्प होता.
उदयनराजेंचे समर्थक आक्रमक - वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी खासदार उदयनराजेंनी आक्रमक भूमिका घेत किल्ले रायगडावर आक्रोश आंदोलन केले. पुढील आंदोलन आझाद मैदानावर करणार असल्याचे देखील जाहीर केले आहे. राज्यपालांनंतर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी छत्रपतींचा एकेरी उल्लेख केल्याने उदयनराजेंचे समर्थक आणखीनच आक्रमक झाले आहेत. सोमवारी दुपारी अचानक महामार्गावर टायर पेटवून वाहतूक रोखली. तसेच कोश्यारी, दानवेंविरोधात घोषणाबाजी केली.
वाहतूक पोलिसांची घटनास्थळी धाव - महामार्गावर टायर पेटवून वाहतूक रोखल्याची माहिती मिळताच सातारा ग्रामीण पोलीस खिंडवाडी येथे दाखल झाले. त्यांनी पेटलेले टायर विझवून महामार्गावरून बाजूला काढले. तोपर्यंत अर्धा तास कराड -सातारा लेनवरील वाहतूक ठप्प होती.
