कोयना धरणाचे दरवाजे बंद, पावसाचा जोरही ओसरला

author img

By

Published : Sep 16, 2021, 8:44 PM IST

Updated : Sep 16, 2021, 8:51 PM IST

कोयना

कोयना धरणाची पाणी पातळी 2161 फूट 11 इंच तर पाणीसाठा 103.19 टीएमसी झाला आहे. धरण पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमान कमी झाल्यामुळे धरणामध्ये पाण्याची आवक कमी होत आहे. त्यामुळे आज (गुरुवारी) सकाळी 11 वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे बंद करण्यात आले आहेत. मात्र, पायथा विद्युत गृहाद्वारे एकूण 2100 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू राहणार आहे.

कराड (सातारा) - कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर ओसरला आहे. तसेच धरणातील पाण्याची आवक देखील कमी होत आहे. त्यामुळे कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे आज (गुरुवारी) सकाळी 11 वाजता बंद करण्यात आले आहेत. सध्या पायथा वीजगृहाद्वारे 2100 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.

कोयना धरणाचे दरवाजे बंद

कोयना धरणाची पाणी पातळी 2161 फूट 11 इंच तर पाणीसाठा 103.19 टीएमसी झाला आहे. धरण पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमान कमी झाल्यामुळे धरणामध्ये पाण्याची आवक कमी होत आहे. त्यामुळे आज (गुरुवारी) सकाळी 11 वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे बंद करण्यात आले आहेत. मात्र, पायथा विद्युत गृहाद्वारे एकूण 2100 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू राहणार आहे. धरणात पाण्याची आवक वाढल्यास पायथा विद्युतगृहाद्वारे सोडल्या जाणार्‍या विसर्गात वाढ करण्यात येईल, अशी माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे.

हेही वाचा - 32 कोटी खर्चूनही लासुर ते कोपरगाव महामार्गावर खड्डे; पालकमंत्री सुभाष देसाईंची थेट नितीन गडकरींकडे तक्रार

Last Updated :Sep 16, 2021, 8:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.