ETV Bharat / state

नवीन वर्षाचे स्वागत कास पठारावर करत असाल...तर सावधान!

author img

By

Published : Dec 28, 2019, 10:09 PM IST

kas pathar news
नवीन वर्षाचे स्वागत कास पठारावर करत असाल...तर सावधान !

थर्टीफस्टच्या पार्टीसाठी कास पठार किंवा नजिकच्या परिसरात जाण्याचा बेत आखत असाल, तर सावधान! कारण दारू पार्ट्या, चुलीवरचा स्वयंपाक हे बेत तुम्हाला महागात पडू शकतात.

सातारा - थर्टीफस्टच्या पार्टीसाठी कास पठार किंवा नजिकच्या परिसरात जाण्याचा बेत आखत असाल, तर सावधान! कारण दारू पार्ट्या, चुलीवरचा स्वयंपाक हे बेत तुम्हाला महागात पडू शकतात.

नवीन वर्षाचे स्वागत कास पठारावर करत असाल...तर सावधान !
31 डिसेंबरला वनविभागाच्या फिरत्या पथकाची कास पठारावर नजर असणार आहे. या ठिकाणी पार्टी करताना आढळल्यास फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागू शकते. प्लास्टिक पत्रावळी, पाणी-शितपेयांच्या रिकाम्या बाटल्या, खाद्यपदार्थांचे रॅपर व इतर कचऱ्याने परिसर अस्वच्छ होऊ नये, यासाठी प्रशानसनाने ही खबरदारी घेतली आहे. अनेकदा या ठिकाणी पर्यटकांकडून फटाके फोडण्यात येतात तसेच पर्यावरण व वन्य प्राण्यांना होणाऱ्या उपद्रवामुळे वन विभागाने हे पाऊल उचलल्याची माहिती वनक्षेत्रपालांनी दिली आहे.

हेही वाचा - ठाण्यात मेडीकलमध्ये गोळीबार; एकाचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद


या निसर्ग कंटकांचा बंदोबस्त करण्यासाठी वन कर्मचाऱ्यांचे खास फिरते पथक तैनात करण्यात आले आहे. हे पथक बामणोली ते सह्याद्री नगर परिसर व कास पठार परिसर क्षेत्रावर नजर ठेवणार आहे.

कास पठार हे पर्यावरणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असून त्याला जागतिक निसर्ग वारसास्थळाचा दर्जा आहे. काही नागरिक याठिकाणी चूल पेटवणे, पार्ट्या करून कचरा फेकणे, मोठ्या आवाजात गाणी लावणे यांसारखे प्रकार करून पर्यावरणाला उपद्रव करतात. अशा लोकांचा बंदोबस्त करून वन कायद्यानुसार कडक फौजदारी कारवाई केली जाणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल शितल राठोड यांनी दिली आहे.

Intro:सातारा : थर्टीफस्टच्या पार्टीसाठी कास पठार किंवा त्या परिसरात जायचा बेत आखत असाल, दारु प्यायची, चुलीवर स्वयंपाक असा विचार करत असाल तर सावधान! हा विचार सोडून द्या, तुम्हांला ते महागात पडू शकते ! कारण सातारा वनविभागाच्या फिरत्या पथकाची पठारावर नजर राहणार आहे. पठारावर पार्टी करताना आढळल्यास फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागू शकते.Body:नाताळानंतर थर्टीफस्ट डिसेंबरचे वेध सर्वांनाच लागतात. मावळत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्ष‍ाचे स्वागत करताना पार्टी ही आलीच. मग सातारकर‍ कास पठाराकडे कूच करतात. निसर्गात जात असताना तेथील निसर्गनियम पायदळी तुडवले जातात. प्लास्टिक पत्रावळी, पाणी-शितपेयांच्या रिकाम्या बाटल्या, खाद्यपदार्थांचे रॅपर व इतर कचरा टाकून येतात. मोठ्या आवाजात स्पिकर लावून नाचगाणी करतात, फटाके फोडले जातात. त्यामुळे पर्यावरण व वन्य प्राण्यांना उपद्रव होतो. पर्यावरणाची हानी होते.
यावेळी असे घडू न देण्याचा निर्धार
सातारा वनविभागाने केला आहे. या निसर्ग उपद्रविंचा बंदोबस्त करण्यासाठी वन कर्मचा-य‍ांचे खास फिरते पथक तैनात करण्यात आले आहे. हे पथक बामणोली ते सह्याद्री नगर परिसर व कास पठार परिसर क्षेत्रात नजर ठेवून असणार आहे.
या संदर्भात सातारच्या वनक्षेत्रपाल श्रीमती शितल राठोड यांनी सांगितले, कास पठार हे क्षेत्र पर्यावरणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. जागतिक निसर्ग वारसास्थळाचा त्याला दर्जा आहे. काही नागरिक या क्षेत्रात जाऊन चुल पेटवणे, पार्ट्या करुन कचरा फेकणे, प्लास्टीक कचरा इतरत्र टाकणे, मोठ्या आवाजात गाणी लावून धांगडधिंगा घालणे असले प्रकार करतात. पर्यावरण व वन्यजीवांना होणारा उपद्रव टाळण्यासाठी अशा व्यक्तींवर वन कायद्यानुसार कडक फौजदारी कारवाई केली जाणार आहे.


कार्यवाहीची माहिती देताना वनक्षेत्रपाल शितल राठोड
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.