अतिवृष्टीग्रस्त कुटुंबांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी सरकार प्रयत्नशील - शंभूराज देसाई

author img

By

Published : Sep 14, 2021, 4:32 PM IST

Shambhuraj Desai

अतिवृष्टीतील बाधितांसाठी कोयनानगर (ता. पाटण) येथे उभारण्यात येत असलेल्या तात्पुरत्या निवारा शेडची पाहणी केल्यानंतर मिरगाव भूस्खलनातील बाधितांनी प्रतिष्ठापना केलेल्या गणेशमुर्तीचे गृहराज्यमंत्र्यांनी दर्शन घेतले

कराड (सातारा) - जुलै महिन्यातील अतिवृष्टीत भूस्खलन होऊन बाधित झालेल्या कुटुंबांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे सांगून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी कोयनानगरमधील कोयनेतील बाधितांच्या तात्पुरत्या निवारा शेडची पाहणी केली.


अतिवृष्टीतील बाधितांसाठी कोयनानगर (ता. पाटण) येथे उभारण्यात येत असलेल्या तात्पुरत्या निवारा शेडची पाहणी केल्यानंतर मिरगाव भूस्खलनातील बाधितांनी प्रतिष्ठापना केलेल्या गणेशमूर्तीचे गृहराज्यमंत्र्यांनी दर्शन घेतले. यावेळी पाटणचे तहसिलदार योगेश टोम्पे, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, शिवदौलत सहकारी बँकेचे संचालक अशोकराव पाटील, शशिकांत जाधव, शैलेंद्र शेलार, भरत साळुंखे, अभिजित पाटील यांच्यासह मिरगावमधील बाधित विजय बाकाडे, धोंडीराम बाकाडे, संजय बाकाडे, उत्तम बाकाडे उपस्थित होते.

हे ही वाचा -मुंबईत अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीला अटक

अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन घरे जमीनदोस्त झालेल्या मिरगाव, ढोकावळे, हुंबरळी गावांतील लोकांची तात्पुरती निवार्‍याची सोय करण्याचे आदेश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार कोयनानगरच्या शासकीय वसाहतीतील रिकाम्या निवासी इमारतींची तातडीने दुरुस्ती करुन बाधितांच्या निवार्‍याची सोय करण्यात आली आहे. अतिवृष्टीतील बाधित कुटुंबांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासंदर्भात शासनस्तरावर दोन बैठकाही झाल्या आहेत. सिडको आणि एमएसआरडीसीच्या माध्यमातून घरांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केले असल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

हे ही वाचा - केंद्र सरकारकडून पेगॅसिस मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाची देखील फसवणूक - संजय राऊतांचा आरोप


बाधितांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यासाठी लागणार्‍या जागा निश्चित करण्याचे काम महसूल विभागाकडून युध्द पातळीवर सुरू आहे. पुनर्वसनासाठी खासगी जागा खरेदी करुन त्या ठिकाणी त्यांचे पुनर्वसन करण्याची तयारी शासनाने ठेवली आहे. पहिल्या टप्प्यात संपूर्ण घर जमीनदोस्त झालेल्या बाधितांना तात्पुरता निवारा देण्याचे काम झाले आहे. त्याच धर्तीवर कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे शंभूराज देसाईंनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.