ETV Bharat / state

नव्या उड्डाण पुलाचा प्रस्ताव आठवडयात सादर करा; उदयनराजेंची महामार्ग प्राधिकरणास सूचना

author img

By

Published : Nov 15, 2019, 10:31 AM IST

Updated : Nov 15, 2019, 10:49 AM IST

उदयनराजेंची महामार्ग प्राधिकरणास सूचना

कोल्हापूर नाक्यावरून पुण्याकडे जाणार्‍या लेनवर उड्डाण पूल नाही. या ठिकाणी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत वाहतुकीची कोंडी असते. त्यामुळे वारंवार अपघातही होतात. माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी गुरूवारी कोल्हापूर नाक्यावरील अपघात प्रवण क्षेत्राची पाहणी केली.

सातारा - कराडचे प्रवेशद्वार असलेला कोल्हापूर नाका अपघात प्रवण क्षेत्र बनला आहे. त्या पार्श्वभूमीवर साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी गुरूवारी नाक्यावरील अपघातप्रवण क्षेत्राची पाहणी केली. यावेळी नवीन उड्डाणपुलाचा प्रस्ताव आठवड्यात सादर करण्याची सूचनाही उदयनराजेंनी महामार्ग विभागाच्या अधिकार्‍यांना केली.

उदयनराजेंची महामार्ग प्राधिकरणास सूचना


कोल्हापूर नाक्यावरून पुण्याकडे जाणार्‍या लेनवर उड्डाण पूल नाही. या ठिकाणी सकाळपासून रात्री उशीरापर्यंत वाहतुकीची कोंडी असते. त्यामुळे वारंवार अपघातही होतात. मागील आठवड्यात सोळा चाकांच्या कंटेनरने मोटरसायकलला धडक दिल्याने लहान मुलगी जागीच ठार झाली होती. त्यामुळे कराड नगरपालिकेतील जनशक्ती-यशवंत विकास आघाडीचे नेते, नगरसेवक राजेंद्रसिंह यादव यांच्या विनंतीवरून माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी कोल्हापूर नाक्यावरील अपघात प्रवण क्षेत्राची पाहणी केली.

हेही वाचा - भाजप जिल्हाध्यक्षाच्या 'त्या' वक्तव्याबद्दल उदयनराजेंनी मागितली मुस्लीम बांधवांची माफी


यावेळी कराड नगरपालिकेतील जनशक्ती-यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्रसिंह यादव, बांधकाम सभापती हणमंतराव पवार, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, नगरसेवक बाळासाहेब यादव, स्मिता हुलवान, सुप्रिया खराडे, अर्चना ढेकळे, किरण पाटील, सुनील काटकर यांच्यासह महामार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे अधिकरी उपस्थित होते.

Intro:कराडचे प्रवेशद्वार असलेला कोल्हापूर नाका अलिकडे अपघात प्रवण क्षेत्र बनला आहे. त्या पार्श्वभूमीवर सातारचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी गुरूवारी कोल्हापूर नाक्यावरील अपघातप्रवण क्षेत्राची पाहणी केली. नवीन उड्डाणपुलाचा प्रस्ताव आठवड्यात सादर करा, अशी सूचनाही उदयनराजेंनी महामार्ग विभागाच्या अधिकार्‍यांना केली. Body:कराड (सातारा) - पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वरील महत्वाचे शहर असलेल्या शहर म्हणजे कराड. या कराडचे प्रवेशद्वार असलेला कोल्हापूर नाका अलिकडे अपघात प्रवण क्षेत्र बनला आहे. मागील आठवड्यातच याठिकाणी कंटेनरच्या धडकेत लहान मुलगी ठार झाली होती. त्या पार्श्वभूमीवर सातारचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी गुरूवारी कोल्हापूर नाक्यावरील अपघातप्रवण क्षेत्राची पाहणी केली. नवीन उड्डाणपुलाचा प्रस्ताव आठवड्यात सादर करा, अशी सूचनाही उदयनराजेंनी महामार्ग विभागाच्या अधिकार्‍यांना केली. 
  कराड नगरपालिकेतील जनशक्ती-यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्रसिंह यादव, बांधकाम सभापती हणमंतराव पवार, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, नगरसेवक बाळासाहेब यादव, स्मिता हुलवान, सुप्रिया खराडे, अर्चना ढेकळे, किरण पाटील, सुनील काटकर यांच्यासह महामार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे अधिकरी यावेळी उपस्थित होते. 
कोल्हापूर नाक्यावरून पुण्याला जाणार्‍या लेनवर उड्डाण पूल नाही. त्यामुळे या ठिकाणी सकाळपासून रात्री उशीरापर्यंत वाहतुकीची कोंडी असते. त्यामुळे वारंवार अपघातही होतात. कोल्हापूर नाक्यावर झालेल्या अपघातांमध्ये बर्‍याच जणांना जीव गमवावा लागला आहे. मागील आठवड्यात सोळा चाकाच्या कंटेनरने मोटरसायकलला धडक दिल्याने लहान मुलगी जागीच ठार झाली होती. त्यामुळे कोल्हापूर नाका अपघात प्रवण क्षेत्र म्हणून चर्चेत आला आणि नागरीकांनीही संतप्त भावना व्यक्त केल्या. त्यामुळे कराड नगरपालिकेतील जनशक्ती-यशवंत विकास आघाडीचे नेते, नगरसेवक राजेंद्रसिंह यादव यांच्या विनंतीवरून माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी गुरूवारी कराडात येऊन कोल्हापूर नाक्यावरील अपघात प्रवण क्षेत्राची पाहणी केली. महामार्ग प्राधिकरण आणि रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांना नव्या उड्डाण पुलाचा प्रस्ताव आठवड्यात सादर करण्याची सूचनाही उदयनराजेंनी केली. तसेच नवा उड्डाण पूल होईपर्यत सध्याच्या पुलावर वाहतूक वळविण्यासही सांगितले.
Conclusion:
Last Updated :Nov 15, 2019, 10:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.