ETV Bharat / state

Prithviraj Chavan On Adani : अदानी समूहाच्या घोटाळ्याची आरबीआय, सेबीने चौकशी करावी - पृथ्वीराज चव्हाण

author img

By

Published : Feb 4, 2023, 11:07 PM IST

अदानी उद्योग समूहाच्या घोटाळ्याची आरबीआय, सेबीने चौकशी करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. अदानी उद्योग समुहास एसबीआय आणि एलआयसीने विनातारण कर्ज उपलब्ध करुन दिले आहे. या वित्तीय संस्थांमधील सर्वसामान्यांचा पैसा परत मिळण्यासाठी सोमवारी (दि. ६) कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन करणार असल्याची हाक त्यांनी दिली.

Etv Bharat अदानी समूहाच्या घोटाळ्याची आरबीआय, सेबीने चौकशी करावी - पृथ्वीराज चव्हाण
अदानी समूहाच्या घोटाळ्याची आरबीआय, सेबीने चौकशी करावी - पृथ्वीराज चव्हाण

अदानी समूहाच्या घोटाळ्याची आरबीआय, सेबीने चौकशी करावी - पृथ्वीराज चव्हाण

सातारा - अदानी उद्योग समूहाच्या घोटाळ्याची आरबीआय, सेबीने चौकशी करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत केली. अदानी उद्योग समुहास एसबीआय आणि एलआयसीने विनातारण कर्ज उपलब्ध करुन दिले आहे. या वित्तीय संस्थांमधील सर्वसामान्यांचा पैसा परत मिळण्यासाठी सोमवारी (दि. ६) कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन करणार असल्याची हाक त्यांनी दिली.

अदानीला समूहाला केंद्र सरकारची मदत : 'हात से हात जोडो' अभियानाचा प्रारंभ सातारा काँग्रेस भवनात झाला. त्यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, स्टेट बँक ऑफ इंडिया व भारतीय आयुर्विमा महामंडळामार्फत अदानींना मोठ्या प्रमाणात विनातारण कर्ज देण्यात आलेले आहे. मोठा घोटाळा उघडकीस आल्याने स्टेट बँक व एलआयसीमधील सर्वसामान्यांचा पैसा असुरक्षित झाला आहे. तरी देखील केंद्र सरकार विविध मार्गाने अदानीला मदत करण्याचा खटाटोप सुरू आहे.

निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प : आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला आहे. हा अर्थसंकल्प फसवा आणि भ्रमनिराश करणारा असल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. जगातील सर्वात मोठा घोटाळा होवूनही अदानी स्वत:चा बचाव करताना दिसत नाहीत. परंतु, केंद्रातील मंत्री अदानींच्या बचावासाठी सरसावले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एलआयसी या वित्तीय संस्थांमधील सर्वसामान्यांचा पैसा परत मिळण्यासाठी काँग्रेसच्यावतीने आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकार टिकण्याची शाश्वती नाही : पृथ्वीराज चव्हाण यांनी शिंदे-फडणवीस सरकारवरही निशाणा साधला. ते म्हणाले, राज्यातील घटनाबाह्य सरकार टिकण्याची शाश्वती नसल्यानेच मंत्रीमंडळ विस्तार रखडला आहे. मंत्रीमंडळ विस्ताराच्या वावड्या उठल्या आहेत. परंतु, अधिवेशनापूर्वी विस्तार होणार असेल तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत.

एकत्र लढलो तर विजय निश्चित : सर्वच पोटनिवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढली. त्या ठिकाणी भाजपचा धुव्वा उडाला आहे. त्यामुळे आपले सरकार टिकेल का, याची शाश्वती नसल्यामुळे शिंदे सरकारला मंत्रिमंडळाचा विस्तार करता येत नाही. रोज दिल्लीच्या वाऱ्या सुरू आहेत. त्यामुळे भविष्यात आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलो तर आमचा विजय हा निश्चित असल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

अनुभव नव्हता पण हिताचे निर्णय घेतले : आमदारकीचा अनुभव नसताना ते मुख्यमंत्री झाले. त्यामुळेच आमच्यात समन्वय कमी झाला. त्यांनी विरोधकांना मदतही केल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केला होता. त्याला उत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मी दिल्लीतून राज्यात आलो आणि आमदार म्हणून काम केले, हे खरे आहे, पण कोणत्याही विरोधकाला ही मदत केली नाही. मला अनुभव जरी नसला तरी राज्याच्या हिताचे चांगले निर्णय त्यावेळी घेतले, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

हेही वाचा - Nana Patole On Ajit Pawar : सत्यजित तांबे प्रकरण अजित पवारांनी चव्हाट्यावर आणले; नाना पटोले यांचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.