ETV Bharat / state

जरंडेश्वर कारखान्याच्या प्रश्नी सातारा जिल्हा बँकेला ईडीची नोटीस

author img

By

Published : Jul 10, 2021, 3:12 PM IST

Updated : Jul 10, 2021, 3:18 PM IST

कोरेगाव जवळचा जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना खासगी तत्वावर खरेदी करताना संबंधितांना ९६ कोटी रुपयांचे कर्ज सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने दिले होते. हे कर्ज कशाच्या आधारे दिले, त्याची कागदपत्रे सादर करण्याचे आदेश ईडीने बँकेला दिले असल्याचे सांगण्यात येते.

सातारा जिल्हा बँक
सातारा जिल्हा बँक

सातारा - अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 'जरंडेश्वर कारखाना'प्रश्नी नोटीस काढली आहे. या नोटिशीमुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

अधिकाऱ्यांचा बोलण्यास नकार

कोरेगाव जवळचा जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना खासगी तत्वावर खरेदी करताना संबंधितांना ९६ कोटी रुपयांचे कर्ज सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने दिले होते. हे कर्ज कशाच्या आधारे दिले, त्याची कागदपत्रे सादर करण्याचे आदेश ईडीने बँकेला दिले असल्याचे सांगण्यात येते. बँकेतील अधिकाऱ्यांनी या संदर्भात बोलण्यास नकार दिला.

सहकार क्षेत्रात खळबळ

जरंडेश्वर साखर कारखाना कर्ज प्रकरणाची ईडीने चौकशी सुरू केली आहे. पुणे जिल्हा बँकेसोबत चार बँकांनी 'जरंडेश्वर'साठी कर्ज दिले होते. त्यात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचाही सहभाग आहे. त्यआनुषंगाने ही नोटीस काढण्यात आल्याचे सांगण्यात येते. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले सध्या भाजपामध्ये असले तरी ही बँक राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. आता ईडीने या बँकेला नोटीस काढल्याने जिल्ह्यासह संपूर्ण सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

कारवाईला राजकीयदृष्ट्या अधिक महत्त्व

पार्श्वभूमीराज्य सहकारी बँकेतील कथित 25 हजार कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गेल्या आठवड्यात कोरेगावजवळील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे. हा कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकाच्या ताब्यात होता. त्यामुळे या कारवाईला राजकीयदृष्ट्या अधिक महत्त्व आहे.

Last Updated :Jul 10, 2021, 3:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.