ETV Bharat / state

Minister Shambhuraje लाईट गेल्याने मंत्री शंभूराजेंनी उत्पादन शुल्कच्या अधिकार्‍याला झापले, प्रशासकीय वर्तुळात नाराजी

author img

By

Published : Aug 29, 2022, 8:16 AM IST

Minister Shambhuraje scolded the Excise Department officer
मंत्री शंभुराजे

मंत्री झाल्यानंतर शंभूराज देसाई रविवारी पहिल्यांदाच कराडला आले होते. सर्किट हाऊसमध्ये त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी अचानक वीज पुरवठा खंडीत electricity issue in Satara झाला. त्यामुळे ते संतापले. त्याठिकाणी उपस्थित असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एका अधिकार्‍याला लाईट कशी गेली, अशी विचारणा केली.

सातारा पत्रकार परिषदेवेळी लाईट गेल्याच्या कारणावरून उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाईंनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍याला एकेरी शब्दात झापले. लाईट आली नसती तर तू वाचला नसतास. जमत नसेल तर घरी जा, अशा शब्दांत त्यांनी पत्रकारांसमोर Minister Shambhuraje scolded officer अधिकार्‍याचा पाणउतारा केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मर्जीतील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी लाईट गेल्याच्या कारणावरून पत्रकार परिषदेत उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍याला एकेरी शब्दात Minister Shambhuraje press in Satara झापले.


उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्याचा वीजेशी काय संबंध मंत्री झाल्यानंतर शंभूराज देसाई रविवारी पहिल्यांदाच कराडला आले होते. सर्किट हाऊसमध्ये त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी अचानक वीज पुरवठा खंडीत electricity issue in Satara झाला. त्यामुळे ते संतापले. त्याठिकाणी उपस्थित असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एका अधिकार्‍याला लाईट कशी गेली, अशी विचारणा केली. अधिकारी म्हणाला, साहेब मला माहित नाही. मी नवीन आहे. त्यामुळे शंभूराज देसाईंच्या रागाचा पारा चढला. तेवढ्यात लाईट आली आणि ते अधिकार्‍याला म्हणाले, लाईट आली नसती तर तू वाचला नसतास. जमत नसेल तर घरी जा. भर पत्रकार परिषदेत मंत्र्याने पत्रकारांसमोर एका अधिकार्‍याचा पाणउतारा केल्यामुळे प्रशासकीय वर्तुळात दिवसभर या घटनेचीच चर्चा होती.



त्याला समजून सांगा, मला असले चालत नाही चष्मा गाडीत विसरल्यावरून सुरूवातीलाच शंभूराज देसाईंनी आपल्या खासगी पीएला झापले होते. त्यानंतर लाईट गेल्याचा राग त्यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यावर काढला. तुला प्रोटोकॉल कळतो का, असे विचारत त्याला समजावून सांगा. मला असले चालत नाही, असे त्यांनी आपल्या पीएला सुनावले.



विना हेल्मेट दुचाकीवरून फिरताना झाले होते ट्रोल Minister Shambhuraje controversies महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहराज्यमंत्री असताना शासकीय लवाजमा बाजूला ठेऊन शंभुराजेंनी दुचाकीवरून सातार्‍यात फेरफटका मारला होता. तो व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियात त्यांना ट्रोल करण्यात आले होते. हेल्मेट का घातले नाही, असे विचारत दंडात्मक कारवाईची मागणीही नेटकर्‍यांनी केली होती. गृहराज्यमंत्र्यांना हेल्मेटची गरज नाही का, की त्यांचे डोके लोखंडाचे आहे, असा सवाल करत एका नेटकर्‍याने थेट सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांना गृहराज्यमंत्र्यांकडे लायसन्सची विचारणा करण्याची मागणी केली होती.


पाटणमध्येही महिला पोलीस अधिकार्‍यांशी घातली होती हुज्जत विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर ऑक्टोंबर 2019 मध्ये प्रमाणपत्र आणण्यासाठी शंभूराज देसाई पाटला गेले होते. त्यावेळी एका कार्यकर्त्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून शंभूराज देसाई आणि तत्कालिन सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्यात वादावादी झाली होती. कार्यकर्त्याला पोलीस ठाण्यातून बाहेर आणल्याशिवाय मी इथून हलणार नाही, असा पवित्रा घेत त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मारला होता. त्यावरून शंभूराज देसाईंनी तृप्ती सोनवणे यांच्याशी हुज्जत घातली होती. त्यांनी देखील कायदेशीर भाषेत शंभूराजेंना सुनावले होते.

हेही वाचा Shabhuraje Desai अडीच वर्षांत काँग्रेस राष्ट्रवादीने शिवसेना संपवून टाकली, शंभूराजे देसाईंचा घणाघात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.