ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादीतील बंडाचे ईडी कारवाई हे कारण नाही - शरद पवार

author img

By

Published : Jul 3, 2023, 3:04 PM IST

Updated : Jul 3, 2023, 7:58 PM IST

शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान मोदींनाच खोटे ठरवले आहे. अजित पवार यांना त्यांनी सत्तेमध्ये सहभागी करुन घेतल्याने मोदींनी केलेले सर्व भ्रष्टाचाराचे आरोप खोटे असल्याचे पवार म्हणाले. ते साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

Etv Bharat
Etv Bharat

सातारा - शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान मोदींनाच खोटे ठरवले आहे. अजित पवार यांना त्यांनी सत्तेमध्ये सहभागी करुन घेतल्याने मोदींनी केलेले सर्व भ्रष्टाचाराचे आरोप खोटे असल्याचे पवार म्हणाले. ते साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

जयंत पाटील यांनी पत्र लिहिले आहे. ते विचार करुनच लिहिले असेल असे शरद पवार म्हणाले. जयंत पाटील घटनेचा नियम पाहूनच काम करत आहेत. तसेच अजित पवार यांच्यावर दबाव असल्याची माहिती मला नाही, असे शरद पवार यांनी सांगितले. अजित दादांना सहभागी करुन घेतल्याने भ्रष्टाचाराचे सर्व आरोप खोटे असल्याचे पवार म्हणाले.

मोदींचे आरोप खोटे - राष्ट्रवादी भ्रष्ट पक्ष असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर लगेच राष्ट्रवादीत फूट पडली आहे. त्यामुळे याला धरून देखील शरद पवार यांनी भाष्य केले आहे. जर पंतप्रधान यांचे आरोप खरे आहेत तर राष्ट्रवादीच्या आमदारांना त्यांनी मंत्रिमंडळात का सहभागी करून घेतले? याचा अर्थ मोदी यांनी केलेले आरोप हे खरे नसल्याचे यामुळे सिद्ध झाल्याचे शरद पवार यांनी सातारा येथील पत्रकार परिषदेत सांगितले

अजित पवार म्हणजे पक्ष नाही - ईडीची कारवाई हे या बंडामागचे कारण नाही. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आरोप हे वास्तववादी नाहीत. अजित पवार म्हणजे पक्ष नाही. तसेच अजित पवार यांनी सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केली असल्याची काही माहिती माझ्याकडे नाही. पक्षाचा अध्यक्ष खंबीर आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी साताऱ्यात दिली आहे.

  • NCP chief Sharad Pawar, says "Many from there (Ajit Pawar) camp called me and said that their ideology is not different from that of NCP and they will take a final call in the next few days" pic.twitter.com/AnjbSxesC3

    — ANI (@ANI) July 3, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अजित पवार परके नव्हते - एखादी महत्वाची मोहिम सुरू करण्यासाठी गुरूपौर्णिमा हा चांगला दिवस असतो. म्हणून आज यशवंतरावांच्या स्मृतींना वंदन करून मी ही मोहिम सुरू केली. भाजपच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नातून राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होता. ज्या प्रवृत्तींशी आमचा संघर्ष आहे, त्यांच्यासोबत गेले. पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी मी पुढाकार घेतला आहे. अजित पवार कुणी परके नव्हते, एकत्र काम केल्यानंतरही मतभिन्नता असते. त्यामुळे त्यांच्याविषयी संशय व्यक्त करणार नाही, असे शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले.

हेही वाचा -

  1. Maharashtra Political Crisis : अजित पवारांसोबत मुख्यमंत्रीपदासाठी डील? विरोधकांची उघड चर्चा
  2. NCP Political Crisis : शरद पवारांसोबत राष्ट्रवादीची यंगब्रिगेड; ज्येष्ठांची फळी मात्र....
  3. NIA Raids In Pune Mumbai: इस्लामिक स्टेटशी संबंध असल्याचा संशय; 'एनआयए'ची मुंबई, पुणे येथे 5 ठिकाणी छापेमारी
Last Updated :Jul 3, 2023, 7:58 PM IST

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.