ETV Bharat / state

Prateek Patil : जयंत पाटलांचे सुपुत्र सांगलीतून विधानसभा लढणार?; कार्यकर्त्यांनी केली मागणी

author img

By

Published : Apr 20, 2022, 4:28 PM IST

आगामी विधानसभा ( Maharashtra Assembly Election ) निवडणुकीमध्ये जयंत पाटील ( Minister Jayant Patil ) यांचे सुपुत्र प्रतिक पाटील ( Prateek Patil ) रिंगणात असण्याची शक्यता आहे.

Prateek Patil
Prateek Patil

सांगली - आगामी विधानसभा ( Maharashtra Assembly Election ) निवडणुकीमध्ये जलसंपदा मंत्री जयंत पाटील ( Minister Jayant Patil ) यांचे सुपुत्र प्रतिक पाटील ( Prateek Patil ) रिंगणात असण्याची शक्यता आहे. याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. थेट सांगलीतून प्रतिक पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी स्थानिकांनी जयंत पाटलांकडे केली आहे.

प्रतीक पाटील उतरणार विधानसभेच्या मैदानात? - गेल्या काही महिन्यांपासून सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतिक पाटील यांची राजकीय वाटचाल चर्चेचा विषय ठरत आहे. प्रतीक पाटील यांचे वेगवेगळ्या माध्यमातून राजकीय लाँचिंग देखील करण्यात आले आहे. आता विधानसभा निवडणुकाजवळ येऊ लागल्याने प्रतिक पाटील यांच्यासाठी विधानसभा मतदार संघ तयार करण्याचे काम सुरु असल्याची चर्चा रंगली आहे. तर, इस्लामपूर-वाळवा मतदार संघातुन जयंत पाटील हे सुपुत्र प्रतिक पाटीलांना मैदानात उतरवणार अश्या वावड्या उठल्या आहेत. तश्या बातम्या देखील स्थानिक माध्यमातून छापून आल्या आहेत. त्यामुळे अनेक तर्क-वितर्क देखील सुरू झाले.

कार्यकर्ते उमेदवारीची मागणी करताना

प्रतीक पाटील सांगली मधून लढणार? - आता सांगली राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिक जयंत पाटीलांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली आहे. पण, थेट सांगली मतदार संघातून प्रतिक पाटीलांना उमेदवारी देण्याची मागणी परिवार संवाद यात्रेमध्ये जयंत पाटलांकडे केली गेली. सांगली शहर अध्यक्ष व जयंत पाटील यांचे कट्टर मानले जाणारे संजय बजाज यांनी आपल्या भाषणातून जयंत पाटलांकडे ही मागणी केली आहे. त्यानंतर सांगली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याच्या मागणीला उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिसाद दिला.

उमेदवारीवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत होणार कलह - एका अर्थाने संजय बजाज यांनी प्रतिक पाटील यांच्या उमेदवारीबाबत केलेली मागणी म्हणजे जयंत पाटलांची सुप्त इच्छा असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत प्रतिक पाटील मैदानात असणार हे स्पष्ट झाले आहे. पण, प्रतिक पाटलांना सांगलीतून उमेदवारी मिळणार की अन्य मतदार संघातून? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र, सांगलीची जागा काँग्रेसच्या वाट्याला आहे. या जागेवर राष्ट्रवादीकडून प्रतिक पाटील यांच्या उमेदवारीची मागणी केली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये कलह निर्माण होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - Satara Honey Trap : तरुणांना अडकवायचे 'हनीट्रॅप'मध्ये; वाईतील बंटी बबलीला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.