ETV Bharat / state

बुधगावमध्ये दुचाकी आणि डंपरचा अपघात, अपघातात एका महिलेचा मृत्यू

author img

By

Published : Feb 27, 2020, 4:58 PM IST

Two-wheeler and dumper accident in Budhgaon in Sangli district
सांगली जिल्ह्यातील बुधगावमध्ये दुचाकी आणि डंपरचा अपघात, अपघातात एका महिलेचा मृत्यू

दुचाकी आणि डंपरचा बुधगावमधील वसंतदादा पाटील महाविद्यालयाजवळ अपघात झाला. अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला.

सांगली - दुचाकी आणि डंपरचा बुधगावमध्ये अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. अपघातात मृत आणि जखमी हे पती-पत्नी असून सांगलीकडे येताना ही घटना घडली आहे.

सांगली जिल्ह्यातील बुधगावमध्ये दुचाकी आणि डंपरचा अपघात, अपघातात एका महिलेचा मृत्यू

तासगाव तालुक्यातील गव्हाण येथील दांपत्य सांगलीकडे येत असताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर, पती गंभीर जखमी झाला आहे. बुधगाव नजीकच्या वसंतदादा पाटील महाविद्यालयाजवळ डंपरला ओव्हरटेक करताना हा अपघात घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सांगलीच्या दिशेने जाणाऱ्या डंपरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात तोल जाऊन दुचाकी डंपरच्या पुढील चाकात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्यामध्ये दुचाकीवरील नंदा गुंडासो घाळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर गुंडासो गंगाराम घाळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.