ETV Bharat / state

पायी निघालेल्या दिंडीतील तिघा भाविकांना भरधाव वाहनाने चिरडले

author img

By

Published : Oct 31, 2021, 11:45 AM IST

सोलापूर जिल्ह्याच्या मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथील प्रसिध्द असणाऱ्या महालिंगराया यात्रेसाठी कर्नाटकच्या रायचूर जिल्ह्यामधून निघालेल्या पायी दिंडीला चिरडल्याची घटना घडली आहे.पुण्याहुन पंढरपूर मार्गावर आलेल्या एका भरधाव चार चाकी वाहनाने दिंडीतील तिघा भाविकांना चिरडून ठार केले आहे.

तिघा भाविकांना भरधाव वाहनाने चिरडले
तिघा भाविकांना भरधाव वाहनाने चिरडले

सांगली - पायी निघालेल्या दिंडीतील तिघा भाविकांना भरधाव गाडीने चिरडून ठार केल्याची भीषण घटना जतच्या उमदी येथे घडली आहे. मृत झालेले तिन्ही भाविक हे कर्नाटकच्या रायचूर जिल्ह्यातील असून सोलापूरच्या मंगळवेढा येथील यात्रेसाठी पायी निघालेल्या दिंडीवर काळाने घाला घातला आहे. गाडीचे टायर फुटून हा अपघात झाला आहे.

दिंडीला निघालेल्या भाविकांना चिरडले

सोलापूर जिल्ह्याच्या मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथील प्रसिध्द असणाऱ्या महालिंगराया यात्रेसाठी कर्नाटकच्या रायचूर जिल्ह्यामधून निघालेल्या पायी दिंडीला चिरडल्याची घटना घडली आहे.पुण्याहुन पंढरपूर मार्गावर आलेल्या एका भरधाव चार चाकी वाहनाने दिंडीतील तिघा भाविकांना चिरडून ठार केले आहे.

टायर फुटून घडला अपघात -

यामध्ये बसवराज दुर्गाप्पा चिंचवडे रा. मदभावी,तालुका लिंगसूर, जिल्हा रायचुर. नागप्‍पा सोमांना आचनाळ ,रा.देवभूसर, तालुका लिंगसूर,जिल्हा रायचूर,आणि म्हणप्पा दुर्गप्पा गोंदीकल,रायचूर , कर्नाटक असे मृत्यू झालेल्या तिघा भाविकांची नावे आहेत.दीपावलीच्या निमित्ताने हुलजंती,तालुका मंगळवेढा येथील महालिंगराया यात्रा मोठ्या प्रमाणात भरते,या यात्रेसाठी पायी दिंडी निघाली असता जत तालुक्यातील पंढरपूर ते विजापूर मार्गावरील उमदी पासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर शेवाळे वस्ती जवळ पुण्याहून आलेल्या चार चाकी गाडीचा टायर फुटले,त्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला हा भीषण अपघात घडला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.