ETV Bharat / state

Babasaheb Ambedkar : साडेतीन हजार चौरस फुटांची बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिकृती साकारत अभिवादन

author img

By

Published : Dec 6, 2022, 2:24 PM IST

Babasaheb Ambedkar
बाबासाहेबांची कोलाज प्रतिकृती

वह्या आणि पुस्तकाच्या माध्यमातून तब्बल साडे तीन हजार चौरस फूटांची बाबासाहेबांची कोलाज प्रतिकृती साकारून अभिवादन करण्यात आले आहे. अभिजित कदम ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणात ( Abhijit Kadam Junior College premises ) ही तब्बल साडे तीन हजार चौरस फुटांचे बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती ( Replica of Babasaheb Ambedkar ) वह्या आणि पुस्तकापासून बनवण्यात आली.

सांगली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Doctor Babasaheb Ambedkar ) यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने ( Mahaparinirvana day ) सांगलीच्या कडेगाव येथील अमरापूर येथील विध्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखे पद्धतीने अभिवादन केले आहे. वह्या आणि पुस्तकाच्या माध्यमातून तब्बल साडेतीन हजार चौरसफूटांची बाबासाहेबांची कोलाज प्रतिकृती साकारून अभिवादन करण्यात आले आहे.


पुस्तक वापरून बाबासाहेबांची ही प्रतिकृती : भारती विद्यापीठाच्या अभिजित कदम ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणात ही तब्बल साडे तीन हजार चौरस फुटांचे बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती वह्या आणि पुस्तकापासून बनवण्यात आली. 3 हजार 221 वह्या पुस्तक वापरून बाबासाहेबांची ही प्रतिकृती बनवण्यात आली आहे, कलाशिक्षक नरेश लोहार यांच्या कल्पनेतून विद्यार्थ्यांना मिळून 2 दिवस 15 तासांच्या अथक प्रयत्नातून ही वह्या-पुस्तकांची भव्य दिव्य प्रतिकृती साकारत मानवी साखळी करून बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले आहे.

बाबासाहेबांची कोलाज प्रतिकृती


प्रतिकृतिमधून अभिवादन करण्याचे नियोजन : विभक्ती कलाशिक्षक नरेश लोहार म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथ हेच गुरु असल्याचे सांगितले आहे, आणि बाबासाहेबांनी शिक्षणाचा दिलेला संदेश, त्यामुळे बाबासाहेबांना पुस्तकरुपी कोलजा प्रतिकृतिमधून अभिवादन करण्याचे नियोजन शाळेच्यावतीने करण्यात आले होते. यामध्ये शाळेतले सर्व विद्यार्थी शिक्षक मुख्याध्यापक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता, आणि 50 बाय 75 फूट आकाराच्या तब्बल साडेतीन हजार चौरस फूट क्षेत्रात ही बाबासाहेबांची कोलाज प्रतिकृती साकारण्यात आली आहे. भारताला संविधान देणारे महापुरुष व वाचाल तर वाचाल हा संदेश देणाऱ्या बाबासाहेबांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.