ETV Bharat / state

केंद्राची उज्वला गॅस प्रमाणे भाजपा आमदारांनी मिळतेय "सुरक्षा" योजना - निलम गोऱ्हे

author img

By

Published : May 23, 2022, 4:02 PM IST

shivsena leader nilam gorhe on ujwala gas scheme in sangli
निलम गोऱ्हे

भाजप नेत्यांना केंद्राकडून देण्यात येणाऱ्या सुरक्षा मुद्द्यावरून बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या,कोव्हिडं काळामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगले काम केले आहे. धारावी झोपडपट्टी येथील कार्याची दखल WHO ने देखील घेतली आहे.अनेक गाव कोरोना मुक्त केली आहे. मात्र, या गोष्टी माध्यम समाजासमोर येऊ नये म्हणून,केंद्र सरकारने ठरवले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतील त्यांना उज्वला गॅस योजने सारखे सुरक्षा देण्याची योजना सुरू केली आहे. ज्यांना केंद्राची सुरक्षा हवी आहे,ते उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत,असा टोला लगावला

सांगली - केंद्र सरकारकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या भाजप नेते,आमदारांना देण्यात येणारी सुरक्षा म्हणजे केंद्राच्या उज्वला गॅस योजनेप्रमाणे एक"सुरक्षा योजना" असल्याचे टीका विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. तसेच राज ठाकरे यांचे भाजपकडून "राजकीय गेम"होईल,असे भाकीत देखील गोऱ्हे यांनी केले.

नीलम गोऱ्हे यांची भाजपा आणि राज ठाकरेंवर टीका - विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या नीलम गोरे यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर बैठक पार पडली या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेतून निलम गोऱ्हे यांनी केंद्र सरकार आणि राज्यातल्या भाजपा नेता आणि राज ठाकरेंवर सडकून टीका केली.

राज यांचा राजकिय गेम होणार - नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, राज ठाकरे यांचा राजकीय गेम होऊ शकतो. राजकीय गेम म्हणजे त्यांच्यासोबत भाजप राजकीय कुरघोडी करू शकते. राज ठाकरे भाजपबद्दल अनुकूल भूमिका घेत आहेत.पण भाजप काम झाले की राज ठाकरे यांना वाऱ्यावर सोडेल. इसाप नीतीची कथा अशीच आहे.आम्ही भाजपचा अनुभव घेतला आहे.भाजप त्यांनी तिकीट वाटपावेळी वाऱ्यावर सोडून देईल.कारण भाजपला उत्तर भारतीयांची मतं हवी असतात.त्यामुळे हा धडा त्यांना लक्षात येईल.

ही,तर उज्वला गॅस प्रमाणे सुरक्षा योजना - भाजप नेत्यांना केंद्राकडून देण्यात येणाऱ्या सुरक्षा मुद्द्यावरून बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या,कोव्हिडं काळामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगले काम केले आहे. धारावी झोपडपट्टी येथील कार्याची दखल WHO ने देखील घेतली आहे.अनेक गाव कोरोना मुक्त केली आहे. मात्र, या गोष्टी माध्यम समाजासमोर येऊ नये म्हणून,केंद्र सरकारने ठरवले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतील त्यांना उज्वला गॅस योजने सारखे सुरक्षा देण्याची योजना सुरू केली आहे. ज्यांना केंद्राची सुरक्षा हवी आहे,ते उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत,असा टोला लगावला आहे.

काहींना वेदना तर काहींना वार्ता रोग - काही लोकांना वेगवेगळ्या प्रकारचं आजार होतात,एका व्यक्तीला डोके दुःखी,पोट दुःखी अश्या सगळया वेदना होत आहेत. कारण त्यांचा पक्षाचा मुख्यमंत्री झाला नाही. तसंच नवनीत राणा उत्तम प्रकारच्या कसलेल्या अभिनेत्या आहेत. त्यामुळे डायलॉग लिहून दिले जाते, त्याप्रमाणे त्या बोलत असतील. मला वाटतं लिलावात रुग्णालयाच्यानंतर त्यांना वार्ता रोग झाला आहे का ? ज्यामुळे ते रोज काही तर बोलत आहेत,हे समोर येईल,असा खोचक टोला नीलम गोऱ्हे यांनी लागवला आहे.

नाटक तेच पात्र बदलतात - त्याच बरोबर एखाद्या नाटकाच्या कथा प्रमाणे साध्य सगळे सुरू आहे.पण कथा तीच आहे. मात्र पात्र बदलत आहेत. नारायण राणे,किरीट सोमम्या, नवनीत राणा,कंगना राणावत,रवी राणा. असेल, पुढे आणखी कोणी. असे केवळ पात्र बदलत आहेत,पण सुत्रधार तेच दिल्ली आणि मुंबईतील आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संवेदनशील पणे काम करत आहेत,महिलांचा सन्मान करतात, ते कदाचित त्यांना सहन होत नसेल,अशी टीकाही भाजपावर निलमताई गोऱ्हे यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.