राष्ट्रवादीत बंडखोरी? आमदाराच्या तक्रारीनंतर सांगली जिल्हा बँकेच्या चौकशीचे आदेश, ईडीकडे तक्रार करणार फराटे

author img

By

Published : Sep 15, 2021, 6:48 AM IST

Updated : Sep 15, 2021, 7:00 AM IST

sanagli dcc bank

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारभारावरून गेल्या काही वर्षांपासून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. नोकरभरती वरून स्वतंत्र भारत पक्ष या शेतकरी संघटनेचे नेते सुनील फराटे यांनी वारंवार तक्रारी दाखल केल्या होत्या, याबाबत आंदोलनही केली. तसेच या बँकेची नोकर भरती आणि इतर गोष्टींच्या बाबतीत चौकशी करण्याची मागणी सहकार आयुक्त यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांच्या मागणी नंतर सहकार आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच फराटे यांनी बँकेतील घोटाळ्यासंदर्भात ईडी चौकशीची मागणी करणार असल्याचे सांगितले आहे.

सांगली - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत करण्यात आलेली नोकर भरती आणि विविध ठिकाणी बँकेच्या कारभाराविषयी उपस्थित झालेल्या प्रश्नांवरून सहकार आयुक्तांकडून बँकेची चौकशी लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मानसिंगराव नाईक यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून पुणे विभागीय सहकार आयुक्तांनी या चौकशीचे आदेश दिले आहेत. तर आणखी एक तक्रारदार असणारे स्वतंत्र भारत पक्षाचे सुनील फराटे यांनी बँकेच्या घोटाळ्यांच्या बाबतीत आता थेट किरीट सोमैया यांच्याकडे सर्व पुरावे सादर करून ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशीचे आदेश...

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारभारावरून गेल्या काही वर्षांपासून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. नोकरभरती वरून स्वतंत्र भारत पक्ष या शेतकरी संघटनेचे नेते सुनील फराटे यांनी वारंवार तक्रारी दाखल केल्या होत्या, याबाबत आंदोलनही केली. तसेच या बँकेची नोकर भरती आणि इतर गोष्टींच्या बाबतीत चौकशी करण्याची मागणी सहकार आयुक्त यांच्याकडे करण्यात आली होती. त्या पाठोपाठ जिल्हा मध्यवर्ती बँकेसह अनेक शाखेत अनावश्यक नूतनीकरण आणि जाहिरातीवर करण्यात आलेल्या खर्चावरून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांनी देखील तक्रार दाखल केली आहे.

ईडीकडे तक्रार करणार फराटे

बँकेच्या लेखनिक आणि शिपाई भरतीला परवानगी देऊ नये, अशी मागणी देखील सहकार विभागाकडे आमदार मानसिंगराव नाईक यांनी केली आहे. तर सुनील फराटे यांनी दाखल केलेली तक्रार आणि आमदार मानसिंगराव नाईक यांनी नव्याने दाखल केलेली तक्रार, याची दखल घेऊन सहकार आयुक्त पुणे यांनी कोल्हापूर विभागीय सहकार आयुक्तांना सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशी करण्याचे पुन्हा एकदा आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सहकार आणि राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

ईडी चौकशीसाठी आता किरीट सोमैयाकडे जाणार-

तर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारभाराबाबत स्वतंत्र भारत पक्षाचे सुनील फराटे यांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र आता बँकेच्या कारभाराची चौकशी सोबतच, बँकेतील गैरव्यवहाराबाबत सर्व पुरावे भाजपा नेते किरीट सोमैया यांच्याकडे देखील सादर करून बँकेच्या सर्व गैर कारभाराची ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे फराटे यांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्या विरुद्ध राष्ट्रवादी आमदाराची तक्रार...

विशेष बाब म्हणजे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सर्वपक्षीय संचालक मंडळ आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक दिलीप पाटील हे अध्यक्ष आहेत, असे असताना जयंत पाटील गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मानसिंगराव नाईक यांनी थेट सहकार विभागाकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेची तक्रार केली होती. त्यामुळे आता जिल्ह्यातल्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

हेही वाचा - राज्यातील चार जिल्हा बँका तोट्यात, राज्य सरकारने 'या' बँकांच्या निवडणुका ढकलल्या पुढे

हेही वाचा - नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खेडगाव शाखੇला ठेवीदारांनी ठोकले टाळे

हेही वाचा - जरंडेश्वर साखर कारखाना कर्ज प्रकरण : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडून ईडीने मागविली माहिती

Last Updated :Sep 15, 2021, 7:00 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.