ETV Bharat / state

मित्राचा खून करणाऱ्या तरुणाला जन्मठेप; ५ वर्षानंतर लागला निकाल

author img

By

Published : Apr 19, 2019, 6:29 PM IST

जिल्हा सत्र न्यायालय, सांगली

मिरजेत ५ वर्षापूर्वी मित्राचा खून करणाऱ्या तरुणाला सांगली सत्र न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

सांगली - दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या रागातून मित्राचा खून केल्या प्रकरणी एका तरुणास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली. जितेंद्र उर्फ प्रदीप तायडे (रा.मिरज) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

जिल्हा सत्र न्यायालय, सांगली

मिरजेतील संजयनगर झोपडपट्टी येथील परशुराम कट्टीमनी या तरुणाचा १४ ऑक्टोबर २०१३ रोजी निर्घृण खून झाला होता. परशुराम याचा मित्र जितेंद्र उर्फ प्रदीप तायडे याने हा खून केला होता. दुर्गामाता उत्सवावेळी ही घटना घडली होती. आरोपी जितेंद्रचे १३ ऑक्टोबरला काही मुलांबरोबर भांडण झाले होते. त्यानंतर त्याने या घटनेची सर्व माहिती परशुरामला सांगत त्याच्याकडे दारू पिण्यास पैसे मागितले. मात्र, परशुरामने पैसे देण्यास नकार दिला. यातून दोघात वादावादी झाली आणि त्यामुळे जितेंद्रने परशुरामवर कुऱ्हाडीने हल्ला करत त्याचा खून केला.

घटनेनंतर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. आज या खटल्याची सांगली जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडल्यानंतर सरकारी पक्षाकडून साक्षीदार तपासण्यात आले. यात मृत परशुराम याचा भाऊ आणि वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. या आधारे न्यायालयाने जितेंद्रला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या खटल्यासाठी सरकारी वकील म्हणून अरविंद देशमुख यांनी काम पाहिले.

Intro:Body:

मित्राचा खून करणाऱ्या तरूणाला जन्मठेपेची शिक्षा; ५ वर्षानंतर लागला निकाल

------------------------------------------------------------------------------------------------------------------

Intro:सरफराज सनदी -सांगली

Av

Feed send file name - R_MH_1_SNG_18_APR_2019_JANMTHEP_SHIKSHA_SARFARAJ_SANADI

दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या रागातून मित्राचा खून करणाऱ्या तरुणास जन्मठेपेची शिक्षा..

अँकर - दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या रागातून मित्राचा खून केल्या प्रकरणी एका तरुणास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे.जितेंद्र उर्फ प्रदीप तायडे असे मिरजेतील तरूणाला शिक्षा सुनावण्यात आली आहे. Body:व्ही वो - मिरजेतील संजयनगर झोपडपट्टी येथिल परशुराम कट्टीमनी या तरुणाचा १४ ऑक्टोबर २०१३ रोजी निर्घृण खून झाला होता.परशुराम याचा मित्र जितेंद्र उर्फ प्रदीप तायडे याने हा खून केला होता.दुगामाता उत्सवा

दरम्यान ही खुनाची घटना घडली होती.आरोपी जितेंद्र याचे दुसऱ्या काही मुलांच्या बरोबर १३ ऑक्टोबर रोजी भांडण झाले होते.यानंतर जितेंद्र हा परशुराम याचा जवळ आला होता.त्याने भांडणाची सर्व हकीकत सांगत परशुराम याच्याकडे दारू पिण्यास पैसे मागितले, मात्र परशुराम याने पैसे देण्यास नकार दिला.यातून परशुराम आणि जितेंद्र यांच्यात वादावादी झाली.यानंतर रात्री उशिरा घरी निघालेल्या परशुराम याला गाठत दारू साठी पैसे दिले नाहीत,या रागातून जितेंद्र उर्फ प्रदीप तायडे याने परशुराम याच्यावर कुऱ्हाडीनी हल्ला करत खुन केला होता.या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.आज या खटल्याची सांगली जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली.

ज्या मध्ये सरकारी पक्षाकडून साक्षीदार तपासण्यात आले.यात मयत परशुराम याचा भाऊ व वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली.या आधारे न्यायालयाने जितेंद्र ऊर्फ प्रदीप तायडे यास दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.या खटल्या कामी सरकारी वकील म्हणून अरविंद देशमुख यांनी काम पाहिले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.