ETV Bharat / state

Ajit Pawar On Love Jihad : लव्ह जिहादवरुन समाजात विष पेरण्याचे काम - अजित पवार

author img

By

Published : Jan 29, 2023, 7:24 PM IST

Ajit pawar on love jihad
Ajit pawar on love jihad

अलीकडच्या काळात सेक्युलर या शब्दाला काहीजण तिलांजली देण्याचे काम करत आहेत. त्यामुळे भारताच्या दृष्टीने ते अत्यंत अडचणीचे होणार आहे अशी, भीती विरोधी पक्षनेते अजित पवारांनी व्यक्त केली आहे. तसेच लव्ह जिहादच्या नावाखाली समाजात विष पेरण्याचे काम सुरु असल्याचा आरोप देखील पवारांनी केली आहे. ते सांगलीच्या कासेगाव याठिकाणी बोलत होते.

लव्ह जिहादवरुन समाजात विष पेरण्याचे काम - अजित पवार

सांगली : वाळवा तालुक्यातील कासेगावमध्ये क्रांतिवीर बाबुजी पाटणकर लोकशास्त्रीय संशोधन, प्रबोधन संस्थेच्या वर्धापनाच्या निमीत्ताने पवार सांगलीत आले होते. त्यांच्या हस्ते क्रांतिवीरांगना इंदुमती पाटणकर स्मारकाच्या पहिल्या टप्पाचे उद्घाटन करण्यात आले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील होते.

जाती-जातीत तेढ : यावेळी बोलताना ,विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, लव्ह जिहादच्या नावाखाली समाजात विष पेरण्याच काम सुरु आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी जाती-जातीत तेढ निर्माण केली जात आहे. मात्र, आज जे समाजात सुरु आहे त्याच्या विरोधात ज्या प्रमाणात उठावा व्हायला पाहिजे. पण तसा तो होताना दिसत नाही,अशी खंत ही विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी व्यक्त केली आहे.

सेक्युलर शब्दाला तिलांजली : क्रांतीविरागणा इंदूमती पाटणकर यांनी स्वातंत्रलढ्या बरोबरच जाती अंताचा लढा उभा केला. त्याकाळी त्यांनी अनेक आंतरजातीय विवाह लावून दिले होते. आता सुद्धा याच भूमीतील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दोन्ही मुलांनी आंतरजातीय विवाह केले आहेत. अलीकडे सेक्युलर या शब्दाला कुठेतरी तिलांजली देण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत. हे आपल्या भारताच्या दृष्टीने अतिशय अडचणीचे होणार आहे, अशी भीती देखील अजित पवारांनी व्यक्त केली आहे.

सत्ताधाऱ्यांची वादग्रस्त विधाने : या वेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, आज समान नागरी कायदा आणला जातो आहे. कसा असेल कुणास ठाऊक, कृष्णा काठच्या लोकांनी इंग्रजांना वाकवले आहे. कृष्णा काठचे लोक कधीही झुकणार नाहीत. यातीलच भारत पाटणकर आहेत. तसेच कशासाठी लढा दिला, का? रक्त सांडले हे, पुन्हा पुन्हा नव्या पिढीला सांगायला हवे. आज व्यक्तिस्वातंत्र्यवर गदा येत आहे. राज्यपाल इतके बोलले तरी, आम्ही गप्प आहोत. चंद्रकांत पाटील यांनी तर जोतीबा फुले आदी महापुरुषांनी भीक मागतील्याचे वक्तव्य केले. कारण समाज किती पेटून उठतो यासाठी अशी वादग्रस्त विधाने करून पाहिले जात आहे असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. याप्रसंगी आमदार विश्वजित कदम, भारत पाटणकर यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थितीत होते.

हेही वाचा - Anganwadi Workers Strike : राज्यातील अंगणवाडी कर्मचारी आक्रमक; 'या' तारखेला जाणार संपावर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.