कोरेगावात होणार नॅनो द्रवरूपी युरियाची विक्री; इफ्को कंपनीच्या स्वदेशी तंत्रज्ञानातून निर्मिती

author img

By

Published : Sep 15, 2021, 9:29 AM IST

इफ्को नॅनो युरिया विक्री शुभारंभ

सरकारने नॅनोला आता नियंत्रण कायदा 1985 नुसार 24 फेब्रुवारी 21 रोजी राजपत्राद्वारे मान्यता दिल्याने कायद्याने आता नॅनो युरियाची जगभर वापर सुरू झाला आहे. त्यामुळे आता नव्याने संशोधन करून तयार केलेल्या नॅनो युरियाचा हनुमान खरेदी विक्री संस्थेच्या माध्यमातून विक्री होऊन सर्व शेतकऱ्यांपर्यत पोहचेल असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

सांगली - नॅनो द्रवरूपी युरिया हा जगामध्ये सर्वप्रथम इफ्को कंपनीमार्फत स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित केलेले आहे. तर संपूर्ण भारतभर 94 पिकांवर 11हजार प्रात्यक्षिके घेऊन त्याचे परीक्षण केले आहे. अश्या मोठ्या कंपनीच्या खतांची विक्री आता सांगलीच्या कोरेगाव येथील हनुमान खरेदी-विक्री सहकारी संस्थेच्या वतीने करण्यात येणार असल्याचे सांगली जिल्हा पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले. ते वाळवा तालुक्यातील कोरेगाव येथील हनुमान खरेदी विक्री संस्थेच्या वतीने उभारण्यात आलेल्या नवीन गोडाऊनचे उदघाट्न व इफ्को नॅनो युरिया विक्री शुभारंभ प्रसंगी कोरेगाव येथे बोलत होते.

कोरेगावात होणार नॅनो द्रवरूपी युरियाची विक्री

नॅनो द्रवरूपी युरिया -

हनुमान खरेदी विक्री संस्थेच्या नवीन गोडाऊनचे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बी.के पाटील यांच्या प्रमुख उपस्थित मंत्री जयंत पाटील यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी राजाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजयकुमार पाटील, राजाराम बापू दूध संघाचे चेरमन विनायक पाटील व इफ्को कंपनीचे अधिकारी डॉ. पवार व परिसरातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री पाटील म्हणाले, संस्थेने स्वतःच्या मालकीची शाखा स्थलांतरित करुन अतिशय चांगल्या प्रकारे इमारत बांधून स्वतःच औषधाचं दुकान अत्यावश्यक व व्यवस्थित रचना करून दुकानाची उभारणी केलेली आहे. पाच ठिकाणी हनुमान खरेदी-विक्री संस्थेच्या शाखा असून कराड व इतर भागातही आपल्या शाखा असून सर्व ठिकाणी अतिशय चांगली सेवा शेतकऱ्यांना बी के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मिळत आहे. आज इफ्को कंपनीने नॅनो द्रवरूपी युरियाचा महत्त्वाचा उपक्रम चालू केला आहे. प्रत्येक झाडांना ज्या 17अन्नद्रव्याची उपयुक्त असते त्यातला प्रामुख्याने प्रथम पहिला अन्नद्रव्य नत्र आहे. भारतामधे एकूण खतामधे पन्नास टक्के वापर हा फक्त युरिया मध्ये होतो एवढा मोठा व्याप हा इफ्को कंपनीचा आहे.

94 पिकांवर 11 हजार प्रात्यक्षिके घेऊन परीक्षण -

इफ्को ही नावाजलेली फार मोठी संस्था आहे. इफको कंपनीने अनेक चांगली कामे केलेली आहेत. नॅनो युरिया हा जगामध्ये सर्वप्रथम इफ्को कंपनी मार्फत स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित केलेले आहे. संपूर्ण भारतभर 94 पिकांवर 11 हजार प्रात्यक्षिके घेऊन त्याचे परीक्षण केले आहे. नॅनो युरियाचे 20 कृषी विद्यापीठे व 20 विज्ञान केंद्रामध्ये परीक्षण चाचण्या करण्यात आल्या आहेत. सरकारने नॅनोला आता नियंत्रण कायदा 1985 नुसार 24 फेब्रुवारी 21 रोजी राजपत्राद्वारे मान्यता दिल्याने कायद्याने आता नॅनो युरियाची जगभर वापर सुरू झाला आहे. त्यामुळे आता नव्याने संशोधन करून तयार केलेल्या नॅनो युरियाचा हनुमान खरेदी विक्री संस्थेच्या माध्यमातून विक्री होऊन सर्व शेतकऱ्यांपर्यत पोहचेल असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

केळी उत्पादक शेतकऱ्यांना फायदा -

हनुमान खरेदी-विक्री संस्थेने केळी काढल्यानंतर त्याला रेफिनिंग चेंबरमध्ये घातल्याशिवाय केळी विकायला सज्ज होत नसल्याने अनेक व्यापारी आपल्या भागातील केळी घेऊन जातात आणि पैसे देत नाहीत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे कोटी रुपये बुडालेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत होते. बी के पाटील सरांनी याचे मर्म ओळखून परिसरातील केळी खरेदी करून आपल्या चेंबरमध्ये चार दिवस ठेवून पाचव्या दिवशी त्याची विक्री करायची हा एक चांगला आणि स्तुत्य उपक्रम असल्याचे जयंत पाटील म्हणाले. यामुळे परिसरातील केळी शेतकऱ्यांना ही एक मोठी पर्वणीच असणार असल्याचे ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.