ETV Bharat / state

Dhananjay Munde Criticized Raj Thackeray : .. राज ठाकरे म्हणजे अर्धवटराव - धनंजय मुंडे

author img

By

Published : Apr 20, 2022, 3:38 PM IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेचा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी जोरदार समाचार घेतला. राज ठाकरे म्हणजे रामदास पाध्ये यांच्या अर्धवटराव बाहुलीप्रमाणे राज ठाकरे अर्धवटराव आहेत. त्यांचा बोलविता धनी कुणी वेगळाच असल्याची टीका मुंडे यांनी ( Dhananjay Munde Criticized Raj Thackeray ) केली.

राज ठाकरे म्हणजे अर्धवटराव - धनंजय मुंडे
राज ठाकरे म्हणजे अर्धवटराव - धनंजय मुंडे

सांगली : महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रामदास पाध्ये यांच्या अर्धवटराव बाहुलीप्रमाणे राज ठाकरे अर्धवटराव आहेत. रामदास पाध्ये ज्यांना बोलायचं नसतं, ते त्यांच्या बाहुल्याच्या तोंडातून बोलत असतात, अशा शब्दात राज ठाकरे यांचा बोलविता धनी दुसराच असल्याचं सांगत धनंजय मुंडे यांनी भाजपावर निशाणा ( Dhananjay Munde Criticized Raj Thackeray ) साधला. ते इस्लामपुरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेत बोलत ( NCP Parivar Sanvad Yatra ) होते.

राष्ट्रवादीची परिवार संवाद यात्रा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची राज्यभर सुरू असलेली परिवार संवाद यात्रा सांगलीमध्ये पोहचली होती. यानिमित्ताने इस्लामपूर ( NCP Pariwar Sanvad Yatra Islampur ) येथे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील ( Minister Jayant Patil ) यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा पार पडली. यासभेसाठी राष्ट्रवादीचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, आमदार अमोल मिटकरी, महिला आघाडीच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या जयंत पाटलांच्या मतदार संघात पार पडणाऱ्या सभेसाठी त्यांचे चिरंजीव प्रतीक पाटील व राष्ट्रवादी नेत्यांनी जय्यत तयारी केली होती.

राज ठाकरे म्हणजे अर्धवटराव - धनंजय मुंडे

देशाचा पाकिस्तान झाल्याशिवाय राहणार नाही : राज ठाकरेंचा समाचार घेताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad Criticized Raj Thackeray ) म्हणाले, विनाकारण तुम्ही बाबासाहेब पुरंदरे आणि जेम्स लेनेला उकरून काढले ( Raj Thackeray Babasaheb Purandare James Laine ) आहे. आता आम्हाला हाडे मोजायाल लावू नये, तसेच माझी टिंगल करून काही होणार नाही, बापाला बाप भेटतो आणि अरे ला का रे म्हणायला तुकारामांनी शिकवले आहे. देशातील जातीय तणावाच्या परिस्थिती विषयी आव्हाड यांनी चिंता व्यक्त करताना, ज्या पद्धतीने सध्या देशात धर्माचे राजकारण चाललंय, ते पाहता देशाचा पाकिस्तान झाल्याशिवाय राहणार नाही, कारण धर्मांधता कधीही विकासाची वाट दाखवू शकत नाही. जातीच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्या पद्धतीने आज मॉब लिंचिंग प्रकार वाढत आहे. तो देशासाठी धोकादायक असल्याची भीती मंत्री आव्हाड यांनी व्यक्त केली.

नव्या पिढीने पुढे जायला हवे : राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, आज राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रातील नवी पिढी घडवण्याचे काम करत आहे. नव्या पिढीने आता हळूहळू पुढे जायला पाहिजे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष सर्व समाज आणि गोरगरीबांचा आहे. तसेच वाळवा तालुक्यातील जनतेने मला हाताच्या फोडासारख जपलं. सोन्यासारखी माणसं होती, म्हणून मला राजकारणात यशस्वी होता आलं. संस्था टिकवण्याच काम माझ्या सर्व सहकाऱ्यांनी केलं, असे भावनिक मत जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

हेही वाचा : अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंसह भाजपा नेत्यांची केली धमाल मिमिक्री

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.