ETV Bharat / state

इस्लामपूरमध्ये मराठा समाज आक्रमक, शिवाजी पुतळ्यासमोर केले मुंडण

author img

By

Published : May 7, 2021, 12:27 PM IST

इस्लामपूरमध्ये मराठा समाज आक्रमक
इस्लामपूरमध्ये मराठा समाज आक्रमक

मराठा आरक्षणावरच्या निर्णयावर फेरविचार व्हावा. तसेच कोणत्या प्रक्रियेद्वारे मराठा समाजाला न्याय मिळेल, यासाठी प्रयत्न करत मराठा समाज यापुढे आक्रमक होईल, असा इशारा पाटील यांनी सरकारला दिला.


सांगली- सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर इस्लामपुरात मराठा समाज आक्रमक झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर समाजाच्या वतीने केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विरोधात घोषणा बाजी करत कार्यकर्त्यांनी मुंडण केले.

यावेळी काँग्रेसचे दिग्विजय पाटील म्हणाले, खचलेल्या मराठी समाजातील मुलांसाठी आरक्षण हा श्वास होता. मराठा समाजाच्या सर्व मागण्यांना फेटाळणाऱ्या सरकार नावाच्या व्यवस्थेला लाथाडायची ही वेळ आली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावरच्या मुद्यांवर फेरविचार व्हावा. तसेच कोणत्या प्रक्रियेद्वारे मराठा समाजाला न्याय मिळेल, यासाठी प्रयत्न करत मराठा समाज यापुढे आक्रमक होईल, असा इशारा पाटील यांनी सरकारला दिला.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अत्यंत दुर्दैवी आहे. मराठा समाजाला न्यायालयाच्या या निर्णयाने मोठा धक्का बसलेला आहे. या निकालाचा अनेक पिढ्यांवर परिणाम होणार आहे. कोर्टाने गायकवाड समितीचा अहवाल फेटाळणे दुर्दैवी आहे. मराठा आरक्षण देण्यासारखी स्थिती राज्यात नाही हे कोर्टाचे म्हणणे चुकीचे व निषेधार्थ आहे. आम्ही पुन्हा लढा उभा करु व आरक्षण मिळवू.

सगळ्याच मराठा नेत्यांचा व राजकीय पक्षांचा मराठा क्रांती मोर्चा वाळवा तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करतो. याप्रसंगी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उमेश कुरळपकर, विजय महाडिक, सागर जाधव, सचिन पवार, अभिजीत शिंदे, विजय लाड , रामभाऊ कचरे,अमोल पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.