ETV Bharat / state

NagarPanchayat Election : कवठेमहांकाळ नगराध्यक्ष निवडणुकीत रोहित आरआर पाटील गटाचा पराभव

author img

By

Published : Oct 21, 2022, 5:37 PM IST

Nagar Panchayat Election
कवठेमहांकाळ नगराध्यक्ष निवडणूक

खासदार संजयकाका पाटील गटाकडून रोहित पाटील गटाला कवठेमहांकाळ नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीत धोबीपछाड ( Defeat of Rohit Patil group ) देण्यात आले आहे. खासदार संजयकाका पाटील गटाच्या सिंधुताई गावडे या चिट्ठीवर विजयी झाल्या ( Victory of MP Sanjaykaka Patil group ) आहेत. राष्ट्रवादीचे चार मते फुटल्याने समान मते मिळाल्याने चिट्टीवर हा निकाल लागला.

सांगली : खासदार संजयकाका पाटील गटाकडून रोहित पाटील गटाला कवठेमहांकाळ नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीत धोबीपछाड ( Defeat of Rohit Patil group ) देण्यात आले आहे. खासदार संजयकाका पाटील गटाच्या सिंधुताई गावडे या चिट्ठीवर विजयी झाल्या ( Victory of MP Sanjaykaka Patil group ) आहेत. राष्ट्रवादीचे चार मते फुटल्याने समान मते मिळाल्याने चिट्टीवर हा निकाल लागला.



कवठेमहांकाळ नगरपंचायत : दहा महिन्यापूर्वी झालेल्या सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ नगरपंचायतीची निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरली ( KavtheMahankal Nagar Panchayat election ) होती. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी बाजी मारली होती. तर भाजपचे खासदार संजय काका पाटील आणि शिवसेनेचे नेते अजितराव घोरपडे यांच्या गटाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली होती. मात्र दहा महिन्याच्या आतच खासदार संजय काका पाटील यांनी कवठेमंकाळ नगरपंचायतमधील राष्ट्रवादीची सत्ता संपुष्टात आणली आहे. राष्ट्रवादीचे चार नगरसेवक फुटल्यामुळे खासदार संजय काका पाटील गटाच्या सिंधुताई गावडे या विजयी झाल्या ( Single handed rule of NCP ) आहेत.

सिंधुताई गावडे ह्या विजयी : संजय काका गटाच्या ( MP Sanjaykaka Patil group) सिंधुताई गावडे आणि रोहित पाटील गटाचे उमेदवार राहुल जगताप यांना प्रत्येकी आठ मत मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी चिट्टीवर मतदान घेतले. यामध्ये संजय काका पाटील गटाच्या सिंधुताई गावडे ह्या विजयी झाल्या. कवठेमहांकाळ नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादीचे बहुमत असून सुद्धा खासदार संजय काका पाटील गटाच्या सिंधुताई गावडे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या असून राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांना हा मोठा धक्का बसला आहे. चार नगरसेवक फुटल्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल जगताप पराभूत झाले आहेत. त्यामुळे कवठेमहांकाळ नगरपंचायतीवर मिळवलेली रोहित आर आर पाटील यांची सत्ता आता संपुष्टात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.