ETV Bharat / state

..त्यामुळे चंद्रकांत पाटलांच्या विधानांना उत्तर देणे आता शक्य होणार नाही - मंत्री जयंत पाटील

author img

By

Published : Oct 26, 2021, 11:47 PM IST

Updated : Oct 27, 2021, 12:06 AM IST

Jayant Patil
Jayant Patil

चंद्रकांत पाटील यांची विधाने फार मनावर घेऊ नयेत, प्रसिध्दीसाठी त्यांच्या सुरू असलेल्या टीकेला उत्तर देणे, आता आम्हाला फारसं शक्य होणार नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे.

सांगली - चंद्रकांत पाटील यांची विधाने फार मनावर घेऊ नयेत, प्रसिध्दीसाठी त्यांच्या सुरू असलेल्या टीकेला उत्तर देणे, आता आम्हाला फारसं शक्य होणार नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारला रोज बदनाम करण्याचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीने हातात घेतला आहे, असा आरोपही मंत्री पाटील यांनी केला आहे. सांगलीमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

कृष्णेवर होणार नवीन पूल -

सांगली शहरातील कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाला समांतर पूल निर्माण होत आहे, या पुलाच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा सांगली जिल्ह्याचे पालक मंत्री व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. यावेळी सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाचे नगरसेवक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील
आयर्विनचा समांतर पूल शहराचे वैभव ठरेल..
यावेळी बोलताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, सांगली शहरातल्या कृष्णा नदीवरील हा समांतर होणारा नवीन पूल सांगलीच्या वैभवात भर घालण्याबरोबर भविष्यातल्या महापुरामध्ये नागरिकांना दिलासा देणारा ठरणार आहे. सांगली शहरातली बाजारपेठ आणि नागरिकांचा विचार करून नव्या पुलाची निर्मिती करण्यात येत आहे, त्यामुळे सांगलीकरांना या पुलामुळे अधिक सोय होणार आहे. तर या पुलाच्या निर्मितीवरून भाजपाकडून सुरू असलेल्या श्रेयवादावर बोलताना जयंत पाटील यांनी सध्याच्या पुलाच्या भूमीपूजनची बांधकाम विभागाकडून छापण्यात आलेल्या पत्रिका बरोबर आयर्विन पुलाच्या उद्घाटनाच्या वेळी छापण्यात आलेल्या पत्रिकेची वाचन करत पुलाच्या उद्घाटनाप्रसंगी केवळ अभियंते आणि पूल निर्माण करणाऱ्या व्यक्तींची नावे त्यावेळी टाकली आहेत. त्यामुळे भविष्यात आमदार सुधीर गाडगीळ आणि आम्ही उद्घाटनाच्या वेळी अशाच पद्धतीची पत्रिका छापू ,असा मिश्कील टोला लगावला.


हे ही वाचा - आर्यन खान प्रकरणातील पंच प्रभाकर साईलला एनसीबीकडून समन्स

संजयकाकांचे ईडीचे विधान योग्य..

त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार संजयकाका पाटील यांनी नुकतेच, आपण भाजपचे खासदार असल्याने ईडी आपल्या मागे लागणार नाही, असे म्हटले होते. या विधानावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, की संजयकाका पाटील यांचे मत बरोबर आहे, जे लोक भीतीने भाजपामध्ये गेले आहेत त्यांच्या मागे ईडी, आयकर अशा तपास यंत्रणा मागे लागत नाहीत, सत्तेचा दुरुपयोग कसा झालेला आहे, याचे भाजपा खासदार संजय पाटील यांनी वर्णन केले आहे, असे मतही मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

चंद्रकांत दादांचे मनावर घेऊ नका..

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आघाडी सरकारवर केलेल्या टीकेबाबत बोलताना मंत्री जयंत पाटील म्हणाले, चंद्रकांत पाटील यांच्या विधानाबाबत आता फारसं मनावर तुम्ही घेऊ नका, ते त्यांचे कामच आहे. वाद निर्माण करून माध्यमांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतात, त्यामुळे त्यांच्यावर सतत प्रतिक्रिया देणे, आता शक्य होईल असं वाटतं नाही, असं स्पष्ट मत मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

लोकशाहीच्या दृष्टीने घातक -

समीर वानखेडे यांच्या बाबतीत बोलताना पाटील म्हणाले, मंत्री पाटील म्हणाले मंत्री नवाब मालिक यांच्याकडून समीर वानखडे यांच्या बाबतीत ज्या पद्धतीने घटनाक्रम सादर करण्यात येत आहे, तर ड्रग्ज छाप्यात साक्षीदाराने मोठ्या रकमेचे ब्लॅकमेलिंग करण्याचे सांगितल्याचे आता पुढे आले आहे. यामध्ये भाजपा समर्थक सहभागी असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले आहे. त्यामुळे हे सर्व प्रकरण लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे, तर
समीर वानखेडे यांच्या मुस्लिम असल्याबाबतची कागदपत्रे नवाब मलिक यांच्याकडून सादर करण्यात आली आहेत आणि ते जर खरे असतील, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. चुकीच्या पद्धतीने सरकारी सेवेत जर कोणी आले असेल, तर याबाबत ही पाऊले उचलावी लागतील, असे मतही जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

Last Updated :Oct 27, 2021, 12:06 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.