Padalkar Criticism of Jayant Patil : माझ्यावर विनयभंग दाखल करण्याचा जयंत पाटलांचा प्लॅन;पडळकरांचा खळबळजणक दावा

author img

By

Published : Mar 25, 2022, 2:25 PM IST

Updated : Mar 25, 2022, 4:37 PM IST

विधान परिषदेतील भाजप आमदार गोपीचंद पडळकर

येत्या 27 मार्च रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे उद्घाटन मेंढपाळांच्या हस्ते होणार असल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेतील भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. (Padalkar Criticism of Jayant Patil ) या उद्घाटनाच्या निमित्ताने जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि सांगलीचे पोलीस अधीक्षक यांनी आपल्या विरोधात विनयभंग गुन्हा दाखल करण्याचा प्लॅन आखल्याचा खळबळजनक दावाही आमदार पडळकर यांनी यावेळी केला आहे.

सांगली - कोणत्या परिस्थितीत 27 मार्च रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे उद्घाटन मेंढपाळांच्या हस्ते होणार असल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेतील भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. (Inauguration of Ahilya Devi Holkar's memorial) या उद्घाटनाच्या निमित्ताने जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि सांगलीचे पोलीस अधीक्षक यांनी आपल्या विरोधात विनयभंग गुन्हा दाखल करण्याचा प्लॅन आखल्याचा खळबळजनक दावाही आमदार पडळकर यांनी यावेळी केला आहे.

विधान परिषदेतील भाजप आमदार गोपीचंद पडळकर

स्मारकाच्या ठिकाणी संचारबंदी लागू - गेली अनेक दिवसांपासून स्मारकाच्या उद्घाटनाचा वाद सुरू आहे. आता 27 मार्चला येथे उद्घाटन होणार आहे. (Water Resources Minister Jayant Patil) त्या पार्श्वभूमीवर कायद सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाच्या वतीने स्मारकाच्या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यावरूनही पडळकर यांनी गंभीर आरोप केले आहेत.

वादाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू - सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्यावतीने सुमारे अडीच कोटी रुपये खर्चून विजयनगर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य असे स्मारक उभारले आहे. मात्र, या स्मारकाच्या उद्घाटनावरून राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप असा संघर्ष सुरू झाला आहे. महापालिकेतील सत्ताधारी पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन एप्रिल रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मात्र भाजपाने विरोध दर्शवला आहे.

स्मारकाच्या ठिकाणी कलम 144 लागू - यावर सर्वपक्षीय कार्यक्रम झाला पाहिजे, अशी मागणी करत शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण सोहळ्याला आक्षेप नोंदवत, आमदार गोपीचंद पडळकर यांनी 27 मार्च रोजी धनगर समाजातल्या मेंढपाळांची हस्ते उद्घाटन करणार असल्याचे जाहीर केले आहे. यावरून सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या ठिकाणी कलम 144 लागू करत संचारबंदी जाहीर केली आहे.

हा पक्षीय अजेंडा राबवण्याचा उद्योग सुरू आहे - दरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी कोणत्याही परिस्थितीत 27 मार्च रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच उद्घाटन मेंढपाळ बांधवांच्या हस्ते होईल. आम्हाला कोणीही अडवू शकत नाहीत. असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. त्याचबरोबर शरद पवार यांना आपला विरोध असून मुळात राष्ट्रवादी काँग्रेसपार्टीकडून हा पक्षीय अजेंडा राबवण्याचा उद्योग सुरू आहे असही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा - Petrol Prices Hiked : चार दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात 2.40 रुपयांनी वाढ

Last Updated :Mar 25, 2022, 4:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.