ETV Bharat / state

Sangli Crime News: गळ्यावर तलवार ठेवून द्राक्ष व्यापाऱ्याला मारहाण; 1 कोटी 10 लाख रुपये लुटले

author img

By

Published : Mar 29, 2023, 10:51 AM IST

Sangli Crime News
द्राक्ष व्यापारयास लुटले

सांगलीच्या तासगावमध्ये एका द्राक्ष व्यापाऱ्याला लुटण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या व्यापाऱ्याकडून सुमारे 1 कोटी 10 लाख रुपये लुटण्यात आले आहे.

सांगली: तासगाव येथील गणेश कॉलनी येथे एका द्राक्ष व्यापाऱ्यास एक कोटी दहा लाखांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. महेश केवलानी( मूळ रा. नाशिक, सध्या तासगाव) असे द्राक्ष व्यापाऱ्याचे नाव आहे. गाडीमधून पैसे घरी घेऊन जात असताना अज्ञात आठ ते दहा जणांनी त्यांना लुटले. या प्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.



गाडी अडवून केली लुट: तासगावच्या दत्तमाळ येथील वसंतदादा महाविद्यालयात शेजारी असणाऱ्या, गणेश कॉलनी येथे द्राक्ष व्यापारी महेश केवलानी व त्यांच्या चालक आणि कामगाराला मारहाण केली. मंगळवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. केवलानी यांची स्कॉर्पिओ गाडी अडवून हा लुट करण्यात आली आहे. महेश केवलानी हे मूळचे पिंपळगाव नाशिकचे आहेत. द्राक्ष खरेदी निमित्ताने केवलानी हे गेल्या चार वर्षांपासून द्राक्ष हंगामात तासगाव येथील दत्तमाळ येथील गणेश कॉलनी येथे राहतात.

प्लॅनिंग करून रचला कट: या घटनेत महेश केवलानी यांच्या डोक्याला मार लागला आहे. त्यानंतर त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर नागरिकांनी धाव घेऊन तासगाव पोलिसांनी माहिती दिली. पोलीसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत पंचनामा केला. या घटनेची माहिती मिळताच सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी देखील घटनास्थळी जाऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली. तसेच हल्लेखोरांच्या शोधासाठी वेगवेगळ्या दिशेने पथके रवाना करत जिल्ह्यात नाकेबंदी करण्यात आली. सदर घटनेमध्ये हल्लेखोरांनी महेश केवलानी यांच्यावर पाळत ठेवून त्यांचा पाठलाग करत त्यांना लुटले आहे. प्लॅनिंग करून हा कट रचल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.



आठ जणांनी गाडीला घेरले: तालुक्यातील द्राक्ष खरेदी केल्यानंतर द्राक्ष बाग शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी मंगळवारी त्यांच्याकडे पैसे आले होते. सांगली येथून केवलानी हे आपल्या गाडीतून पैसे घेऊन सायंकाळी 7.30 च्या सुमारास तासगावच्या गणेश कॉलनी येथे पोहचले. त्याचवेळी दबा धरून आणि पाठलाग करणाऱ्या आला. पहिल्यांदा केवलानी यांच्या गाडी समोर दुचाकी आडवी आली. त्यामुळे केवलानी यांचे चालक आकाश चव्हाण याने गाडी थांबवताच सात ते आठ जणांनी गाडीला घेरले. यावेळी चालक याच्या गळयावर तलवार ठेवून गाडीतील केवलानी यांनी मारहाण केली. त्यांच्याकडे असणारे एक कोटी 10 लाख रक्कमेची बॅग घेऊन हल्लेखोर पसार झाले.

हेही वाचा: Sangli Crime News रिक्षाला गाडी घासल्याने वृद्धाचा खून करणाऱ्या तिघांना 2 तासात अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.