ETV Bharat / state

ऐन दिवाळीत प्लास्टिक गोडाऊनला भीषण आग, बाजूची चार दुकानेही भस्मसात

author img

By

Published : Oct 28, 2019, 1:00 AM IST

Updated : Oct 28, 2019, 2:23 AM IST

सांगलीमध्ये मारुती रोडवरील एका गोडाऊनला लागलेल्या आगीत गोडाऊनसह चार दुकाने भस्मसात झाली आहेत. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी रात्री उशिरापर्यंत शर्थीचे प्रयत्न सुरू होते.

Fire at Plastic Godown in Sangli

सांगली - शहरातील मध्यवस्तीत असणाऱ्या मेहता जनरल स्टोअर्सच्या गोडाऊनला रविवारी रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत मेहता स्टोअर्स सह आजूबाजूची चार दुकाने भास्मसात झाली. आग इतकी भीषण होती की, या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी तब्बल आठ अग्निशमन गाड्यांना पाचारण करावे लागले. रात्री उशिरापर्यंत ही आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू होते.

ऐन दिवाळीत प्लास्टिक गोडाऊनला भीषण आग, बाजूची चार दुकानेही भस्मसात

मारुती रोडवरील आंनद टॉकीज समोर असणाऱ्या मेहता स्टोअर्स हे प्लास्टिक साहित्य विक्रीचे दुकान आणि मागील बाजूला गोडाऊन आहे. रात्री साडेनऊच्या सुमारास या गोडाऊन मधून धूर येऊ लागला आणि अचानक आगीने रौद्र रूप धारण केले. ही आग इतकी भीषण होती, की यामध्ये मेहता स्टोअर्सच्या गोडाऊनसह बाजूची एक बेकरी आणि 2 मोठी दुकाने भास्मसात झाली. या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी रात्री उशिरापर्यंत शर्थीचे प्रयत्न सुरू होते.

Intro:File name - mh_sng_01_aag_vis_01_7203751 - to -
mh_sng_01_aag_vis_04_7203751


स्लग - भीषण आगीत प्लॉस्टिक गोडावून सह चार दुकाने भस्मसात...

अँकर - दिवाळीच्या दिवशी सांगलीत मारुती रोडवरील एका गोडावून मध्ये लागलेल्या आगीत गोडावूनसह चार दुकाने भस्मसात झाली आहेत.यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झालं आहे.उशिरा पर्यंत ही भीषण आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन पथकाकडून प्रयत्न सुरू होते.


सांगलीतील मध्यवस्तीत असणाऱ्या मेहता जनरल स्टोअर्सच्या गोडाऊनला रविवारी रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली.या आगीत मेहता स्टोअर्स सह आजूबाजूची चार दुकाने भासमसात झाली.आग इतकी भीषण होती की,या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी तब्बल आठ अग्निशमन गाड्या बोलावण्यात आल्या. रात्री उशिरापर्यंत ही आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू होते. मारुती रोडवरील आंनद टॉकीज समोर
असणाऱ्या मेहता स्टोअर्स मध्ये प्लास्टिक साहित्य विक्रीचे दुकान आणि मागील बाजूला गोडाऊन आहे.रात्री साडे नऊच्या सुमारास या गोडाऊन मधून धूर येऊ लागला आणि अचानक आगीने रौद्र रूप धारण केले.व ही आग इतकी भीषण होती की,याठिकाणी उंच उंच आगीचे लोळ उठले होते.आणि यामध्ये मेहता स्टोअर्सच्या गोडाऊनसह आजूबाजूची एक बेकरी आणि 2 मोठी दुकाने भासमसात झाली.तर महापालिकलेच्या अग्निशामक विभागाच्या तब्बल आठ ते दहा अग्निशामक बंबाच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण आणण्याचे काम सुरू होते, मात्र उशिरापर्यंत आग आटोक्यात येत नव्हती. या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न रात्री उशिरा पर्यंत सुरू होते .
Body:.

Conclusion:
Last Updated :Oct 28, 2019, 2:23 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.