ETV Bharat / state

Sangli Crime : दगडाने ठेचून गाडी चालकाची हत्या

author img

By

Published : Jul 18, 2022, 3:05 PM IST

Sangli Crime
Sangli Crime

जाडरबोबलाद-मारोळी रस्त्यालगतच्या ओढा पात्रात एका वाहन चालकाचा निर्घृण खून करण्यात आला आहे. श्रीशैल निलाप्पा सायगाव ( वय 45 ), असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अनैतिक संबंधातुन हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांच्याकडून व्यक्त करण्यात येत असून जत पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

सांगली - दगडाने ठेचून एका वाहन चालकाचा निर्घृण खून करण्यात आला आहे. श्रीशैल निलाप्पा सायगाव ( वय 45 ), असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जत तालुक्यातील जाडरबोबलाद याठिकाणी हा प्रकार घडला आहे. अनैतिक संबंधातुन हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांच्याकडून व्यक्त करण्यात येत असून जत पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

जाडरबोबलाद-मारोळी रस्त्यालगतच्या ओढा पात्रात अतिशय निर्घृणपणे तोंड, डोके ठेचून खून करून मृतदेह टाकण्यात आला होता. याची माहिती मिळताच जत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला आहे. खुनाची घटना ही रविवारी रात्री घडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर मृतदेहाजवळ रक्ताने माखलेली कपड्याची पिशवी आढळून आली आहे. त्यामुळे अन्य ठिकाणी खून करून मृतदेह इथे आणून टाकला असावा, तसेच अनैतिक संबंधातून हा खून झाल्याची प्राथमिक अंदाजही पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहे.

हेही वाचा - Attack On Bjp Leader : भाजपच्या महिला नेत्यावर जीवघेणा हल्ला, भर रस्त्यात कार थांबवून धारदार शस्त्राने वार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.