ETV Bharat / state

केंद्राच्या कामगार आणि शेतकरी विधेयकाविरोधात विविध महिला कर्मचाऱ्यांचे आंदोलन

author img

By

Published : Nov 26, 2020, 3:22 PM IST

Updated : Nov 26, 2020, 4:29 PM IST

sanagali protest
शेतकरी विधेयकाविरोधात विविध महिला कर्मचाऱ्यांचे आंदोलन

केंद्र सरकारने नुकताच मंजूर केलेल्या कृषी आणि कामगार कायद्याविरोधात आज देशभरात आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनाला सांगलीतील काही संघटनांनी पाठिंबा दर्शवत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलने केली. तसेच हा कायदा रद्द करण्याची मागणी करत केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली.


सांगली - शेतकरी व कामगार कायद्याच्या विरोधात करण्यात आज विविध संघटनाकडून देशव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यातील अनेक संघटनांनी संप पुकारत या आंदोलनात आपला सहभाग नोंदवला आहे. आशा, गटप्रवर्तक महिला व विविध डाव्या संघटनांनी सांगलीमध्ये एकत्र येत आंदोलन केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत केंद्र सरकारने मंजूर केलेले कामगार आणि शेतकरी विधेयक रद्द करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

शेतकरी विधेयकाविरोधात विविध महिला कर्मचाऱ्यांचे आंदोलन
विविध डाव्या संघटना एकत्र-केंद्र सरकारच्या कृषी आणि कामगार कायद्याच्या विरोधात देशभर विविध संघटनांनी एकत्र येऊन देशव्यापी संप पुकारला आहे. आपला पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात सांगलीमध्ये विविध डाव्या संघटनांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यातील आशा वर्कर, गटप्रर्वतक, अंगणवाडी सेविका आणि अर्धवेळ परिचारिका महिलांनी एकत्र येत केंद्र सरकारच्या धोरणा विरोधात आंदोलन केले. तसेच सांगली जिल्हाधिकारी कार्यालया समोर या संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात आली आहेत. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजीही केली.महिला कर्मचाऱ्यांवर अन्याय करणार कायदा !केंद्राच्या धोरणामुळे देशातील आशा वर्कर, गट प्रवर्तक महिला कर्मचारी यांना मुळात कायद्याचे कोणत्याही प्रकारचे संरक्षण मिळत नाही, वेतन , मानधन वाढ आणि सेवेत कायम करण्याचा प्रश्न आहे. मात्र केंद्राच्या कामगार धोरणामुळे या सर्व महिलांवर अन्याय होणार आहे, असा आरोप या संघटनांनी केला. तसेच हे कायदे तातडीने रद्द करावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे.
Last Updated :Nov 26, 2020, 4:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.