ETV Bharat / state

यावर्षीही 12 वी निकालात कोकण बोर्ड राज्यात प्रथम; सलग दहावेळा अव्वल

author img

By

Published : Aug 3, 2021, 8:31 PM IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज जाहीर करण्यात आला. यामध्ये कोकण विभागाचा सर्वाधिक 99.81 टक्के निकाल लागला आहे. यंदा राज्याचा एकूण निकाल 99.63 टक्के एवढा लागला आहे.

Konkan Division
कोंकण विभाग

रत्नागिरी - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज जाहीर करण्यात आला. यामध्ये कोकण विभागाचा सर्वाधिक 99.81 टक्के निकाल लागला आहे. यंदा राज्याचा एकूण निकाल 99.63 टक्के एवढा लागला असून, मागील वर्षीच्या तुलनेत निकालात 8.97 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

हेही वाचा - महापुरामुळे रत्नागिरी जिल्ह्यात 900 ते 1000 कोटींचे नुकसान; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

27 हजार 332 विद्यार्थी उत्तीर्ण

या परीक्षेसाठी कोकण मंडळामधील एकूण 27 हजार 384 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यात 13 हजार 887 मुले, तर 13 हजार 497 मुलींचा समावेश आहे. त्यापैकी 27 हजार 332 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांची उत्तीर्णतेची संख्या 13 हजार 854 असून, त्यांचे शेकडा प्रमाण 99.76 टक्के आहे. मुलींची उत्तीर्णतेची संख्या 13 हजार 478 असून, त्यांचा शेकडा प्रमाण 99.85 टक्के आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याची उत्तीर्णतेची टक्केवारी 99.60 एवढी आहे. या जिल्ह्यात एकूण 9 हजार 702 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 9 हजार 664 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये 4 हजार 929 मुले, तर 4 हजार 735 मुलींचा समावेश आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 99.66 टक्के असून, मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 99.55 टक्के आहे.

रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल 99.92 टक्के लागला असून, जिल्ह्यातून एकूण 17 हजार 682 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 17 हजार 668 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये 8 हजार 925 मुले, तर 8 हजार 743 मुलींचा समावेश आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 99.96 टक्के असून, मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 99.87 एवढी आहे.

कोकण बोर्ड स्थापनेपासून राज्यात अव्वल

कोकण विभागीय मंडळाच्या स्थापनेपासून मंडळाने बारावीच्या परीक्षेत सलग दहावेळा राज्यात अव्वल स्थान कायम राखले आहे. सन 2012 - 86.25 टक्के, 2013 - 85.88 टक्के, 2014 - 94.85 टक्के, 2015 - 95.68 टक्के, 2016 - 93.29 टक्के, 2017 - 95.20 टक्के, 2018 - 94.85 टक्के, 2019- 93.23 टक्के व सन 2020 ला 95.89 टक्के असा निकाल लागला आहे. यंदाच्या निकालात 3.92 टक्के वाढ झाली आहे. दोन्ही जिल्ह्यांतून मिळून 567 विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यामधून 559 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

हेही वाचा - Konkan flood situation - आम्हाला आता राहते घर सोडावे लागेल, आपली खंत व्यक्त करताना चिपळूणमधील पूरग्रस्त कुटुंबाच्या डोळ्यात पाणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.