ETV Bharat / state

नवनीत राणांना कायदा शिकविण्याची आवश्यकता होती - खासदार विनायक राऊत

author img

By

Published : May 5, 2022, 7:50 PM IST

shivsena mp vinayak raut on mp navneet rana and mns raj thackeray
खासदार विनायक राऊत

राज्यात कायद्याचे राज्य आहे. राणा यांनी उद्धव ठाकरे यांना काय शब्द वापरले आहेत हे पोलिसांनी पाहिले आहे. त्यामुळे कायदा काय आहे हे नवनीत राणा यांना शिकविण्याची आवश्यकता होती, आणि कायद्याच्या रक्षकांनी दाखवून दिलेलं आहे, अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिली.

रत्नागिरी - राज ठाकरे हे एक करमणुकीचे केंद्र आहे, आणि त्यांचा मनसे पक्ष हा भाडोत्री पक्ष आहे. मनसे हा देशातील एकमेव भाड्याचा पक्ष आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. शिवाय,त्यांचे बंधू उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत. ते उत्तम काम करत आहेत. हे राज ठाकरे यांना पाहवत नाही. याबाबत देखील त्यांना बंधूद्वेष असून त्यातून हा थयथयाट सुरु आहे, अशी देखील बोचरी टीका खासदार विनायक राऊत यांनी केलੇ. यावेळी शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर, ज्येष्ठ पत्रकार अलिमिया काझी आदी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस यांना मोठी मोठी स्वप्न पडतात - कायदा आणि सुव्यवस्था बघडविण्याचा डाव मनसे आणि भाजपचा आहे. पण त्याला महाराष्ट्रची जनता भीक घालणार नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बाबरी मशिदीबाबत केलेल्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की, सध्या देवेंद्र फडणवीस यांना मोठी मोठी स्वप्न पडतात आणि काही भूतकाळातील गोष्टी आठवतात. त्यामुळे त्यांनी आता दुसऱ्या स्वातंत्र्य युद्धातील देखील आपला सहभाग जाहीर करावा, अशी उपरोधीक टीका देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

कायदा काय आहे हे नवनीत राणा यांना शिकविण्याची आवश्यकता - राज्यात कायद्याचे राज्य आहे. राणा यांनी उद्धव ठाकरे यांना काय शब्द वापरले आहेत हे पोलिसांनी पाहिले आहे. त्यामुळे कायदा काय आहे हे नवनीत राणा यांना शिकविण्याची आवश्यकता होती, आणि कायद्याच्या रक्षकांनी दाखवून दिलेलं आहे, अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.