Uday Samant On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांना तुरुंगात टाकण्याचा कट - उद्योगमंत्री उदय सामंत

author img

By

Published : Jan 26, 2023, 10:22 PM IST

Updated : Jan 26, 2023, 10:54 PM IST

samant on jayant patil

देवेंद्र फडणवीसांबाबतीमध्ये नक्की काहीतरी षडयंत्र रचले जात होते, अशी, प्रतिक्रिया उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते. महाविकास आघाडीच्या काळात मला तुरुंगात टाकण्यासाठी प्रयत्न झाले असे वक्तव्य भाजपा नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यावरून उदय सामंत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : यावेळी सामंत म्हणाले की, देवेंद्रजी फडणवीस यांच्या वक्तव्याला काहीतरी किनार असणार आहे. देवेंद्रजींच्या बाबतीत विरोधकांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. दरम्यान वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना (ठाकरे गट) जी युती झालेली आहे ती कदाचित जयंत पाटील साहेब यांना मान्य नसावी असे, उदय सामंत यांनी म्हटले आहे.

पोटनिवडणुका बिनविरोध : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ठाणे दौऱ्याबाबत बोलताना सामंत म्हणाले की, प्रत्येकाची संघटना बांधण्याची व्युहरचना ही वेगवेगळी असते. ही लोकशाही आहे. उद्धवजी जर माझ्याही मतदारसंघात येणार असतील तर स्वागत आहे. पुण्यातील 2 विद्यमान आमदारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या ठिकाणी होणाऱ्या पोटनिवडणुकीबाबत बोलताना सामंत म्हणाले की, या पोटनिवडणूका बिनविरोध झाल्या पाहिजेत असं मला वाटतं. तसेच या पोटनिवडणुका लढाई न होता बिनविरोध व्हाव्यात यासाठी सर्व नेत्यांनी प्रयत्न केले पाहिजेत असंही उदय सामंत यावेळी म्हणाले.

महाविकास आघाडीत चुरस : कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीचीमधील तीनही पक्षांनी दोन जागेवर दावा केला आहे. त्यामुळे या होणाऱ्या पोटनिवडणुकीत तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते आहे. पिंपरी चिंचवड या विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेने जोर लावला आहे. पिंपरी चिंचवडची जागा आपल्याला मिळावी, यासाठी आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेते अजित पवार जयंत पाटील, सुनील तटकरे यांच्यासोबत मातोश्रीवर बैठक पार पडली होती. त्यानंतर शिवसेना भवन येथे संजय राऊत उद्धव ठाकरेंची देखील बैठक घेतली.

कसबा पेठ जागेसाठी काँग्रेस इच्छुक : कसबा पेठ विधानसभा निवडणूक गेल्या 25 वर्षापासून काँग्रेस उमेदवार देत आली आहे. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आला असला तरी, येथे काँग्रेसच्या उमेदवाराने कडवी झुंज दिली होती. काँग्रेसचा उमेदवार दुसऱ्या स्थानावर होता. त्यामुळे कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार द्यायला हवा. यासाठी काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांकडून आग्रह धरला जातोय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही कसबा पेठ विधानसभा उमेदवारीवर आपला हक्क सांगितला आहे.


राष्ट्रवादीकडून दोन्ही जागांवर दावा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी चिंचवड आणि कसबा पेठ या दोन्ही विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीत आपला उमेदवार देण्यात तयारीला लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार या दोन्ही जागांवर उमेदवार देण्यासाठी आग्रही आहेत. म्हणूनच आधी पिंपरी चिंचवड मतदार संघात ठाकरे गटाकडून दिल्या जाणाऱ्या उमेदवारी बाबत चर्चा करण्यासाठी अजित पवार मातोश्रीवर पोहोचले होते. तर येत्या दोन फेब्रुवारी च्या होणाऱ्या बैठकीत काँग्रेस सोबत कसबा पेठ येथील मतदार संघाबाबत देखील अजित पवार काँग्रेस सोबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे.

हेही वाचा - Pune Pimpri Chinchwad By Elections : पुणे-पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीत चुरस!

Last Updated :Jan 26, 2023, 10:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.