ETV Bharat / state

वाढत्या उष्माच्या आंब्याला फटका, उन्हाच्या तीव्र झळांनी आंबा भाजला

author img

By

Published : Apr 1, 2021, 3:39 PM IST

heat wave has affected the Mango crop
वाढत्या उष्माच्या आंब्याला फटका, उन्हाच्या तीव्र झळांनी आंबा भाजला

वाढत्या उष्माच्या आंब्याला फटका बसला आहे. उन्हाच्या तीव्र झळांनी आंबा भाजला गेल्यामुळ बागायतदारांची चिंता वाढली आहे.

रत्नागिरी - वाढलेल्या तापमानाचा फटका आंब्याला बसत असून त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. उन्हामुळे आंबा भाजून निघाला आहे, मोठ्या प्रमाणात फळगळ देखील होऊ लागली आहे. त्यामुळे बागायतदारांची चिंता वाढली आहे. मात्र, शेतकऱ्यांना नुकसान होत असताना शासन मात्र आपल्याकडे दुर्लक्ष करत असल्याची खंत आंबा उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत.

वाढत्या उष्माच्या आंब्याला फटका, उन्हाच्या तीव्र झळांनी आंबा भाजला

उन्हाच्या झळांचा आंब्याला फटका -

मध्य महाराष्ट्रात वातावरणातील चक्रीय परिस्थितीने उष्णतेची लाट कोकणकिनारपट्टीपर्यंत दाखल झाली. प्रखर सुर्यकिरणांच्या झळांनी रत्नागिरीकरही त्रस्त झाले आहेत. मार्च महिन्यात कधी नव्हे एवढा पारा कोकणात वाढला. तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसपेक्षाही वाढले होते. त्याचा परिणाम हापूसवर झाला आहे. यावर्षी एक महिना हंगाम उशिरा असल्यामुळे तिसऱ्या टप्प्यात आलेल्या मोहोराला छोटी कैरी धरलेली आहे. ती कैरी गळून पडत आहे. पहिल्या टप्प्यातील आंबा १० टक्केच होता. त्याची तोड बहूतांश पूर्ण होत आली आहे. दुसर्या टप्प्यातील मोहोराला आलेल्या आंब्याची तोड सुरु असून तो उष्णतेच्या लाटेत सापडला आहे. प्रखर सुर्यकिरणांच्या तडाख्यात सापडून झाडाच्या दक्षिण व पश्चिमेकडील फळे भाजून निघाली आहे. फळांच्या आतील भागात साका तयार होण्याची भिती अधिक आहे. भाजलेला आंबा गळून जात आहे, याचा परिणाम उत्पादनावर होत आहे.

10 टक्के आंबा भाजला -

याबाबत बोलताना ज्येष्ठ आंबा उत्पादक शेतकरी तुकाराम घावाळी म्हणाले की, आंबा तयार व्हायला आणि उष्णतेचा कहर व्हायला एक गाठ पडली. हापूस आंब्याला एवढे तापमान अजिबात सहन होत नाही. त्यामुळे एवढ्या तापमानात या आंब्याची साल भाजून निघते, त्यामुळे हे फळ निकामी होत आहे. सध्याच्या आंबा काढणीमध्ये जवळपास 10 टक्के फळ आशा पद्धतीची सापडत आहेत. तयार झालेल्या आंब्याचे मोठं नुकसान होत असून, कैरीची गळ देखील मोठ्या प्रमाणात होत असल्याचे घवाळी यावेळी म्हणाले.

शासनाने लक्ष देण्याची मागणी -

दरम्यान आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांकडे शासन लक्ष देत नसल्याचे घवाळी यावेळी म्हणाले. शासनाने या नुकसानीचा अहवाल तयार करण्याच्या सूचना प्रशासकीय यंत्रणेला द्याव्यात, मदत देणं शक्य नसेल तर किमान बँकांच्या माध्यमातून पीककर्ज देताना ज्या शेतकऱ्यांना कर्ज भरता आलेले नाही त्यांना टप्प्याटप्प्याने ते भरण्याची सवलत द्यावी, ही सवलत मिळाली तरी शेतकरी पुढच्या हंगामासाठी उभा राहू शकेल, असे घवाळी यावेळी म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.