ETV Bharat / state

उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री सोमवारी रत्नागिरी दौऱ्यावर; कोरोना परिस्थितीची घेणार आढावा

author img

By

Published : Jun 18, 2021, 12:29 PM IST

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत रुग्णसंख्या 45 हजारांच्या पुढे जाऊन पोहोचली आहे. एप्रिल व मे महिन्यामध्येच तब्बल 25 हजार रुग्ण सापडले होते. जूनच्या 16 दिवसात नव्याने दहा हजार रुग्ण सापडत आहेत.

ajit pawar, rajesh tope
अजित पवार, राजेश टोपे

रत्नागिरी - राज्यातील अन्य जिल्ह्यांसह मुंबई, पुण्यात रुग्णसंख्या कमी होत असताना, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सोमवार 21 जूनला रत्नागिरी दौर्‍यावर येत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत रुग्णसंख्या 45 हजारांच्या पुढे जाऊन पोहोचली आहे. एप्रिल व मे महिन्यामध्येच तब्बल 25 हजार रुग्ण सापडले होते. जूनच्या 16 दिवसात नव्याने दहा हजार रुग्ण सापडत आहेत. जिल्ह्यात सात दिवसांचा लॉकडाऊन झाल्यानंतरही रुग्णसंख्येत घट होताना दिसत नाही. उलट नियमित पाचशेहून अधिक रुग्ण सापडत आहेत. सध्या टेस्टिंगचे प्रमाण चार दिवसांपासून वाढले असले तरी रुग्णांचा आकडा कमी होताना दिसत नाही.

हेही वाचा - पुणे : परिवहन मंत्री अनिल परब मंत्र्यांकडून मेट्रोच्या कामाची पाहणी; 2022 पर्यंत काम पूर्ण होणार असल्याचं आश्वासन

येथील आरोग्य व्यवस्थेबाबत नेहमीच ओरड होताना दिसत आहे. या पार्श्‍वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे हे रत्नागिरी दौर्‍यावर येत आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते महिला रुग्णालयातील ऑक्सिजन प्लॅन्टचा शुभारंभ होणार आहे. त्याचप्रमाणे बालकांच्या कोरोना केअर सेंटरचाही शुभारंभ केला जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.