रत्नागिरी : नशेसाठी आंब्याच्या बागेवर फवारणी करणारे औषध केले प्राशन, 3 नेपाळी कामगारांचा मृत्यू

author img

By

Published : Sep 20, 2021, 8:43 PM IST

3 nepali workers died in ratnagiri district

दळे येथील सलीम काझी यांच्या बागेत काम करणाऱ्या या तीन नेपाळी कामगारांचा रविवारी रात्री अकस्मात मृत्यू झाला आहे. तशी माहिती नाटे पोलिसांनी दिली आहे. या एकूणच प्रकारामुळे या परिसरात खळबळ उडाली.

राजापूर (रत्नागिरी) - आंबा बागेत काम करणाऱ्या तीन नेपाळी कामगारांचा एकाच दिवशी अवघ्या चार तासात मृत्यू झाल्याची घटना राजापूर तालुक्यातील जैतापूर-दळे येथे रविवारी रात्री घडली आहे. या घटनेने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या तिघांनीही आंबा फवारणीमध्ये आंब्याच्या साईज वाढीसाठी वापरण्यात येणारे औषध प्राशन केल्याने विषबाधा होऊन या तिघांचाही मृत्यू झाल्याची माहिती नाटे सागरी पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी दिली.


यातील निर्मलकुमार ऐनबहाद्दुर ठाकूरी ( वय ३८) याचा नाटे येथून अधिक उपचारासाठी धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता तेथेच त्याचा मृत्यू झाला. दिपक व गोविंद या दोन जणांचा उपचारासाठी जिल्हा शासकिय रूग्णालयात दाखल केल्यावर मृत्यू झाला आहे. रविवारी रात्री ९ ते १ या चार तासात एकापाठोपाठ या तीनही कामगाराचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी
या घटनेनंतर तात्काळ जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, उपविभागीय पोलीस अधिकारी निवास साळोखे, राजापूर पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, नाटेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

तालुक्यातील दळे येथील सलीम काझी यांच्या बागेत काम करणाऱ्या या तीन नेपाळी कामगारांचा रविवारी रात्री अकस्मात मृत्यू झाला आहे. तशी माहिती नाटे पोलिसांनी दिली आहे. या एकूणच प्रकारामुळे या परिसरात खळबळ उडाली. पोलीसांनी देखील तात्काळ चौकशीची चक्रे हलवून या तिघांचा मृत्यू नेमका कशाने झाला याचा शोध घेत आहेत.

औषध प्राशन केल्याने झाला मृत्यू
आंबा बागायतदारांकडून आंबा फवारणी करताना आंब्याची साईज वाढावी, यासाठी एक औषध वापरले जाते. काझी यांच्या बागेतही गोदामात हे औषध होते. नशेसाठी या तिघांनीही पाण्यातून हे औषध घेतले. यात विषबाधा होऊन या तिघांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

जे औषध या तिघांनी प्राशन केले त्या औषधाच्या रिकाम्या बाटल्याही जप्त करण्यात आल्याचे आबासाहेब पाटील यांनी सांगितलं. तर या प्रकरणी आंबा बागायत मालकांसह अन्य सहकाऱ्यांचेही जबाब नोंदवून घेण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. या प्रकरणी नाटे पोलीसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून अधिक तपास आबासाहेब पाटील करत आहेत.

हेही वाचा - रत्नागिरी : 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'चा जयघोष करत बाप्पांना निरोप

हेही वाचा - रिफायनरी प्रकल्प उभारण्यासंदर्भात हालचालींना वेग, एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडून बारसू-सोलगावची पाहणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.