रायगडात 466 बसेसना व्हिटीएस यंत्रणा बसवली; App लाँचिंग लांबणीवर

author img

By

Published : Oct 19, 2021, 4:31 PM IST

file photo

घरबसल्या एका क्लिकवर एसटी बसचे लोकेशन पाहण्याचा मुहूर्त आता पुढे गेला आहे. ऍप लॉंचिंग पुढे गेल्याने प्रवाशांना अजून तरी बस स्थानकावरच एसटीची वाट बघत ताटकळत राहावे लागणार आहे.

पेण(रायगड) - घरबसल्या एका क्लिकवर एसटी बसचे लोकेशन पाहण्याचा मुहूर्त ऍप लॉंचिंग पुढे गेल्याने प्रवाशांना अजून तरी बस स्थानकावरच एसटीची वाट बघत ताटकळत राहावे लागणार आहे. 15 ऑगस्टला हे ऍप महाराष्ट्रात सुरु होणार होते, मात्र, ऑक्टोबर महिना उजाडला तरी हे ऍप लॉन्च झाले नसल्याने प्रवाशांना घरबसल्या गाडीचे लोकेशन पाहण्यासाठी वाट बघावी लागणार आहे.

रायगड विभागातील 466 बसेसना ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील पेण, अलिबाग, श्रीवर्धन, कर्जत, रोहा, मुरुड, माणगाव, पोलादपूर, गोरेगाव, इंदापूर, नागोठणे, रामवाडी, खोपोली या बस स्थानकात एलसीडी स्क्रीन बसविण्यात येणार आहेत. याद्वारे आपली बस कुठंपर्यंत आली आहे हे समजणार आहे. मात्र हे ऍपच लटकल्याने प्रवाशांना वाट पाहावी लागणार आहे.

आगार व्हिटीएस बसवलेल्या बसेस -

1) पेण - 61

2) अलिबाग - 67

3) महाड - 63

4) श्रीवर्धन - 66

5) माणगांव - 49

6) कर्जत - 48

7) मुरूड - 47

8) रोहा - 65

हेही वाचा - सरकार अजून किती आत्महत्येची वाट बघणार? एस टी कामगार संघटना आक्रमक

  • 12 स्थानकात स्क्रीन, तिथेच कळणार लोकेशन -

रायगड विभागातील 466 बसेसला व्हिटीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. जिल्ह्यातील पेण, अलिबाग, श्रीवर्धन, कर्जत, रोहा, मुरुड, माणगाव, पोलादपूर, गोरेगाव, इंदापूर, नागोठणे, रामवाडी, खोपोली अशा बारा स्थानकात एलसीडी स्क्रीन बसविण्यात येणार आहेत. यामुळे या मार्गावरील प्रवाशांना त्यांना हव्या असणाऱ्या बसचे लोकेशन या स्क्रीनवर कळणार आहे.

  • ऍप लॉन्च कधी होणार?

आपल्याला हवी असलेली बस कुठंपर्यंत पोहचली आहे, हे पाहण्यासाठी एसटी महामंडळाने लोकेशन ऍप तयार केले आहे. या ऍपचे 15 ऑगस्टला लोकापर्ण राज्य सरकार तर्फे होणार होते. मात्र, हा मुहूर्त आता पुढे गेला असल्याने प्रवाशांना घरबसल्या बसचे लोकेशन कळण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. आता पुढे हे ऍप कधी लॉन्च होणार याची वाट प्रवासी बघत आहेत.

  • काय काय कळणार?

एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी थोडी लांबली असली तरी हे ऍप लॉन्च झाल्यावर एसटी बसच्या लोकेशनची माहिती प्रवाशांना मिळणार आहे. एसटी महामंडळाच्या बसचं लोकेशन दर्शवणाऱ्या आणि ही माहिती एलसीडी टीव्ही संचाद्वारे बसस्थानकांवर प्रसारीत करणाऱ्या वाहन शोध व प्रवासी माहिती प्रणाली रायगड जिल्ह्यात देखील सुरु होणार आहे. प्रवाशांना बससाठी बसस्थानकात ताटकळत बसावे लागणार नाही. आपल्या प्रवासाची बस समोरील स्थानकामधून कधी निघाली व ती कुठपर्यंत पोहचली, कोणत्या स्थानकावर किती वेळ थांबली तसेच मार्गावर वाहतूक कोंडीमध्ये बस थांबली तरी त्याची माहिती बस स्थानकावरील स्क्रिनवर दिसणार आहे.

लॉकडाऊन काळात बसेसचे बहुतांश सर्वच रुट बंद होते. आता पुन्हा एकदा शाळा सुरु झाल्या आहेत. गाड्यांचे रुट पुन्हा बदलणार आहेत. त्यामुळे हे सगळं री शेड्युल करावे लागणार आहे. त्यामुळे या सेवेला थोडा उशीर होत आहे. मात्र लवकरच ही सेवा कार्यरत होईल. एसटी बसना ट्रेकर सिस्टीम बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती रायगड विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली आहे.

हेही वाचा - ई टीव्ही भारत विशेष : वर्षभरात २५ एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या, कारण काय?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.