ETV Bharat / state

दोन बहिणी धावून आल्या माथेरानच्या घोडे व्यावसायिकांच्या मदतीला

author img

By

Published : May 29, 2021, 6:51 PM IST

Updated : May 29, 2021, 7:04 PM IST

माथेरानमधील घोडे व्यावसायिकांच्या मदतीला मुंबईतील दोन बहिणी धावून आल्या आहेत. नोबडी नेव्हर स्लिप हंगरी संस्थेच्या माध्यमातून घोडे मालक यांच्यासाठी रेशन आणि घोड्यांना चाऱ्याचे वाटप करण्यात आले आहे.

raigad
दोन बहिणींनी केली घोडे व्यावसायिकांना मदत

रायगड - कोरोना महामारीत संचारबंदीत सर्वात जास्त आर्थिक फटका बसला आहे तो हातावर कमवणाऱ्यांना. संचारबंदी असल्याने हाताला काम नाही. त्यामुळे दोन वेळच्या जेवणाचे हाल झालेले आहेत. अशीच काहीशी परिस्थिती पर्यटन क्षेत्र असलेल्या थंड हवेच्या माथेरानमधील घोडे मालक आणि त्याच्या घोड्याची. मुंबईतील शाळेत शिकणाऱ्या दोन बहिणींनी त्यांच्या परिस्थितीची जाणीव होऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून 3 लाखाची आर्थिक मदत उभी केली आहे. रिया आणि दानीया असे या बहिणीची नावे आहेत. नोबडी नेव्हर स्लिप हंगरी संस्थेच्या माध्यमातून घोडे मालक यांच्यासाठी रेशन आणि घोड्यांना चाऱ्याचे वाटप जमलेल्या पैशातून देण्यात आले आहे.

बहिणींनी केली घोडे व्यावसायिकांना मदत

हेही वाचा - कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांसाठी धोरण निश्चित करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पर्यटनावर आधारित माथेरानची अर्थव्यवस्था

थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरान प्रसिद्ध पर्यटन ठिकाण आहे. लाखो पर्यटक दरवर्षी माथेरानला भेट देत असतात. त्यामुळे येथील स्थानिक व्यवसायिक आपला उदरनिर्वाह चालवीत असतात. माथेरान हे इको सेन्सिटिव्ह परिसर असल्याने याठिकाणी येजा करण्यासाठी शहरासारखी वाहने नाहीत. पर्यटकाला रेल्वेने अथवा घोड्यावर बसून माथेरान मध्ये यावे लागते. माथेरान मध्ये येणारे सामान हे घोड्यावरच आणले जाते. माथेरानमध्ये फिरण्यासाठी घोड्याचा वापर केला जातो. त्यामुळे घोडे मालकानाही चार पैसे मिळत असतात. येणाऱ्या पर्यटकांमुळे येथील अर्थव्यवस्था आधारित आहे.

raigad
दोन बहिणींनी केली घोडे व्यावसायिकांना मदत

कोरोनामुळे माथेरानमधील पर्यटन बंद, घोडे व्यवसायिक अडचणीत

देशात कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर सर्वच पर्यटन ठिकाणे बंद करण्यात आली. माथेरान येथेही पर्यटकांना बंदी घालण्यात आली. याचा सर्वाधिक फटका हा घोडे मालक आणि घोड्यांना बसला. पर्यटक येणं बंद झाल्याने हातावर कमवणाऱ्या या घोडे व्यवसायिकांना स्वतःच्या कुटूंबाचा आणि घोड्याचा खर्च कसा भागवायचा हा प्रश्न उपस्थित झाला. घोड्यांना रोज खाण्याचा खर्च करणे गरजेचे आहे. मात्र सध्या हाताला कामच नसल्याने घोड्यांना काय खायला द्यायचा असा प्रश्न घोडे व्यवसायिकांना पडला आहे. त्यामुळे कोरोना संचारबंदीचा मोठा फटका घोडे व्यवसायिकांना बसला आहे.

raigad
दोन बहिणींनी केली घोडे व्यावसायिकांना मदत

रिया आणि दानीया या बहिणी धावून आल्या मदतीला

माथेरान मधील घोडे व्यवसायिक आणि घोड्याच्या खण्यापिण्याचा प्रश्न निर्माण झाल्याची माहिती शाळेत शिकणाऱ्या पंधरा वर्षीय रिया आणि बारा वर्षीय दानीया या बहिणींना कळली. त्यांनी घोड्याच्या आणि घोडे व्यवसायिक याच्या मदतीसाठी काही तरी करायला हवे अशी मनात खूणगाठ बांधली. त्यानंतर दोन्ही बहिणींनी क्राऊडफंडिंग करण्यास सुरुवात केली. व्हॉट्स अ‌ॅप, इन्स्ट्राग्राम, प्राणीमित्र संस्थेकडे मदतीसाठी आवाहन केले. त्याच्या या आवाहनाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून 3 लाखाची मदत जमा झाली. या जमलेल्या मदतीतून नोबडी नेव्हर स्लिप हंगरी या संस्थेच्या माध्यमातून माथेरान मधील घोडे व्यवसायिकांना जीवनावश्यक वस्तू आणि 240 घोड्यांना खाद्य दिले असल्याचे संस्थेचे अध्यक्ष जोहेर दिवाण यांनी सांगितले.

हेही वाचा - झारखंडच्या हजारीबागमध्ये फरशीवर उकळतंय पाणी!

Last Updated : May 29, 2021, 7:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.